रांची (झारखंड) :झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्ण झालं. राज्यात 81 जागांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी 43 जागांवर मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित 38 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. मतदान संपल्यानंतर विविध पोल एजन्सींनी घेतलेल्या एक्झिट पोलचे आकडेही समोर आले आहेत. बहुतांश एक्झिट पोलने झारखंड राज्यात भाजपा आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे.
'पीपल्स पल्स' एक्झिट पोल : 'पीपल्स पल्स' एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्येही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येऊ शकते. तर राज्यात 'इंडिया' 42-48 जागा मिळण्याची शक्यता आहे.
झारखंडमध्ये भाजपाचं सरकार? :'मॅट्रीस' एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये भाजपा सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवला आहे. एकूण 81 विधानसभा जागांपैकी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांना 42 ते 47 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 25 ते 30 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर 1 ते 4 जागा इतरांना मिळू शकतात.