महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राहुल गांधींनी NDA सरकारच्या पहिल्या 15 दिवसांचा मागितला 'हिशोब'; घोटाळ्यांची यादी देत सरकारवर खरमरीत टीका - Rahul Gandhi - RAHUL GANDHI

Rahul Gandhi : 18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचं कामकाज सोमवारपासून सुरु झालं. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आणीबाणीवरुन पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. तर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला घेरणारे 10 मोठे मुद्दे मांडले.

राहुल गांधी
राहुल गांधी (Social Media)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 24, 2024, 7:29 PM IST

नवी दिल्ली Rahul Gandhi :18 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचं आज कामकाज सुरू झालं. यात अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षावर (भाजपा) निशाणा साधला आहे. गेल्या 15 दिवसांतील मोठ्या घटनांबाबत राहुल गांधींनी सोशल मीडियावर केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "भारताचा प्रबळ विरोधक आपला दबाव कायम ठेवेल, लोकांचा आवाज उठवेल आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळून जाऊ देणार नाही. राहुल गांधींनी सोशल मीडियावर पोस्ट करत गेल्या 15 दिवसांतील महत्त्वाच्या घटनांविषयी सांगितलं.

राहुल गांधींची पोस्ट काय :

एनडीए सरकारचे पहिले 15 दिवस :

1. भीषण रेल्वे अपघात

2. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले

3. गाड्यांमधील प्रवाशांची दुर्दशा

4. नीट घोटाळा

5. नीट पीजी रद्द

6. युजीसी नेटचा पेपर लीक झाला, परीक्षा रद्द

7. दूध, डाळी, गॅस, टोल महाग

8. आगीनं जळणारे जंगल

9. जलसंकट

10. उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू

अशी पोस्ट राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर करत नरेंद्र मोदी मानसिकदृष्ट्या बॅकफूटवर आहेत आणि फक्त त्यांचं सरकार वाचवण्यात व्यग्र आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारनं संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. भारताचा प्रबळ विरोधक आपला दबाव कायम ठेवेल, जनतेचा आवाज उठवेल आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळून जाऊ देणार नाही, या शब्दात एनडीए सरकारवर हल्लाबोल केलाय.

मोदींची कॉंग्रेसवर टीका : आज संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीबाबत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आणीबाणीवरुन पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला. यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आणीबाणीबाबत मोदींच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभा अधिवेशन 2024 : आजपासून लोकसभेच्या अधिवेशनाला होणार सुरुवात, पंतप्रधानांसह नवीन सदस्यांचा होणार शपथविधी - Lok Sabha Session 2024
  2. लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली शपथ, विरोधकांचे टोचले कान - First Session Of 18th Lok Sabha
  3. 'जेल की बेल' अरविंद केजरीवालांचा 26 जूनला होणार 'फैसला'; सर्वोच्च न्यायालयाचा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना धक्का - Hearing in SC on Delhi Cm

ABOUT THE AUTHOR

...view details