नवी दिल्ली-ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले. "त्यांनी 17 व्या लोकसभेत मोठे योगदान दिले आहे. त्यांचे सर्वांना मार्गदर्शन मिळेल. नम्र, कुशल व्यक्तीच यशस्वी होतो. ओम बिर्ला यांनी नवीन इतिहास रचला आहे. तरुण खासदारांना बिर्ला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल," असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
"संसदेत पुन्हा खासदारांचे निलंबन होऊ नये," अशी अपेक्षा खासदार अखिलेश यादव यांनी केली. "तुमचा आवाज सत्ताधारी पक्षावरदेखील चालला पाहिजे. सत्ता पक्षासह विरोधी पक्षाचाही तुम्ही सन्मान करावा. कोणत्याही लोकप्रतिनिधीचा आवाज दबला जाऊ नये," अशी अपेक्षाही खासदार अखिलेश यादव यांनी केली.
बिर्ला यांनी बलराम जाखड यांचा मोडला विक्रम!: राजस्थानमधील बलराम जाखड हे सलग दोन वेळा साडेनऊ वर्षांहून अधिक काळ लोकसभेचे अध्यक्ष राहिले. त्यांचा कार्यकाळ 22 जानेवारी 1980 ते 15 जानेवारी 1985 असा होता. यानंतर, 16 जानेवारी 1985 ते 18 डिसेंबर 1989 पर्यंत ते लोकसभेचे अध्यक्ष पद भूषविले होते. याआधी नीलम संजीव रेड्डी याही दोन वेळा लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. मात्र त्यांच्या दोन्ही कार्यकाळात काही वर्षांचे अंतर होते. त्यांचा कार्यकाळही सुमारे अडीच वर्षांचा आहे. एक कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्यांदा सलग लोकसभा पद भूषविणारे बिर्ला हे दुसरे लोकसभा अध्यक्ष ठरले आहेत.