महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; देशाला मिळाले नवे कृषिमंत्री, वाचा संपूर्ण मंत्रिमंडळ आणि खाते फक्त एका क्लिकवर - Modi Cabinet Portfolio - MODI CABINET PORTFOLIO

Modi Cabinet Portfolio : मोदी 3.0 कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीनंतर मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं. अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह बड्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद मिळालं ते जाणून घ्या....

केंद्रीय मंत्रिमंडळ
केंद्रीय मंत्रिमंडळ (Socail Media)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 7:39 PM IST

Updated : Jun 10, 2024, 10:58 PM IST

नवी दिल्ली Modi Cabinet Portfolio :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन एनडीए सरकारच्या 72 मंत्र्यांसह शपथ घेतली. त्यापैकी 30 कॅबिनेट मंत्री, 5 जणांकडे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री आहेत. यानंतर रविवारी झालेल्या मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून गृह मंत्रालय, संरक्षण आणि परराष्ट्र तसंच अर्थ मंत्रालय भाजपानं स्वतःकडं ठेवलंय.

मुख्य खात्याचे मंत्री तेच : प्राप्त माहितीनुसार, मोदींच्या या मंत्रिमंडळात अमित शहा यांच्याकडं पुन्हा गृह मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून राजनाथ सिंह यांच्याकडं पुन्हा संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय. तसंच परराष्ट्र मंत्रालय एस जयशंकर यांच्याकडे तर नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते वाहतूक मंत्रालय देण्यात आलंय. अजय टमटा, हर्ष मल्होत्रा ​​यांना रस्ते वाहतूक राज्यमंत्री करण्यात आलंय. निर्मला सीतारामन यांच्याकडे पुन्हा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलीय तर अश्विनी वैष्णव यांना रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आलं.

शिवराज सिंह चौहान नवे कृषीमंत्री : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना दोन मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यांना ऊर्जा आणि नगरविकास मंत्री करण्यात आलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना एमएसएमई मंत्रालय देण्यात आलंय. शोभा करंदलाजे एमएसएमई राज्यमंत्री असतील. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कृषी मंत्री करण्यात आलंय.

कोणाला कोणतं खातं :

  1. राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री
  2. अमित शाह - गृह मंत्री
  3. अश्विनी वैष्णव - रेल्वे तथा माहिती आणि प्रसारण मंत्री
  4. एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्री
  5. नितीन गडकरी - परिवहन, रस्ते विकास मंत्री
  6. शिवराज सिंह चौहान - कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री
  7. मनोहर लाल खट्टर - ऊर्जा, शहरी विकास मंत्री
  8. सीआर पाटील - जलशक्ती मंत्री
  9. मनसुख मांडविया - कामगार मंत्री
  10. जेपी नड्डा - आरोग्य, रसायन आणि खते मंत्री
  11. ललन सिंह - पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्री
  12. डॉ. विरेंद्र कुमार - समाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्री
  13. चिराग पासवान - क्रीडा मंत्री
  14. किरेन रिजिजू - संसदीय कार्य मंत्री
  15. अन्नपूर्णा देवी - महिला आणि बाल विकास मंत्री
  16. राम मोहन नायडू - नागरी उड्डाण मंत्री
  17. सर्वानंद सोनोवाल - जहाज बांधणी मंत्री
  18. ज्युवेअल राम - आदिवासी कार्य मंत्री
  19. किशन रेड्डी - कोळसा आणि खणन मंत्री
  20. निर्मला सीतारामण - अर्थ मंत्री
  21. जीतन राम मांझी - सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
  22. धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री
  23. एचडी कुमार स्वामी - अवजड उद्योग मंत्री
  24. ज्योतिरादित्य सिंधिया - टेलिकॉम मंत्री
  25. भूपेंद्र यादव - पर्यावरण मंत्री
  26. प्रल्हाद जोशी - ग्राहक संरक्षण मंत्री
  27. गजेंद्र शेखावत - कला, पर्यटन, सांस्कृतिक
  28. पीयूष गोयल - वाणिज्य मंत्री
  29. हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम मंत्री
  30. गिरीराज सिंह - वस्त्रोद्योग मंत्री

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) :

  1. इंदरजित सिंग राव - सांख्यिकी और कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन राज्यमंत्री
  2. जितेंद्र सिंग - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, एटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री
  3. अर्जुन मेघवाल - विधी आणि न्याय, संसदीय कार्य राज्यमंत्री
  4. प्रतापराव जाधव - आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  5. जयंत चौधरी - कौशल्य, शिक्षण राज्यमंत्री

राज्यमंत्री :

  1. श्रीपाद नाईक - गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
  2. शोभा करंदाजे - सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री
  3. शांतनु ठाकुर - पोर्ट शिपिंग राज्यमंत्री
  4. रवनीत बिट्टू - अल्पसंख्यांक राज्यमंत्री
  5. जितीन प्रसाद - वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री
  6. कृष्णन चौधरी - सहकार राज्यमंत्री
  7. रामदास आठवले - सामाजिक न्याय राज्यमंत्री
  8. नित्यानंद राय - गृह राज्यमंत्री
  9. अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री
  10. व्ही सोमन्ना - जलशक्ती, रेल्वे राज्यमंत्री
  11. चंद्रशेखर प्रेमासनी- ग्रामीण विकास राज्यमंत्री
  12. एस पी बघेर - दुग्ध विकास राज्यमंत्री
  13. क्रितीवर्धन सिंह - पर्यावरण राज्यमंत्री
  14. बी एल वर्मा - सामाजिक न्याय राज्यमंत्री
  15. सुरेश गोपी - पेट्रोलियम, पर्यंटन राज्यमंत्री
  16. एल मुरुगन - माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
  17. अजय टम्टा - रस्ते राज्यमंत्री
  18. बंडी संजय कुमार - गृह राज्यमंत्री
  19. कमलेश पासवान - कोळसा राज्यमंत्री
  20. सतीश चंद्र दुबे - खणन राज्यमंत्री
  21. संजय सेठ - संरक्षण राज्यमंत्री
  22. रणवीर सिंह - अन्न प्रक्रिया राज्यमंत्री
  23. दुर्गादास उइके- आदिवासी विकास राज्यमंत्री
  24. रक्षा खडसे - युवक कल्याण राज्यमंत्री
  25. सुकांता मुजुमदार - शिक्षण राज्यमंत्री
  26. सावित्री ठाकुर - महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री
  27. तोखन साहू - शहर विकास राज्यमंत्री
  28. भूषण चौधरी - जलशक्ती राज्यमंत्री
  29. भूपेंद्र राजू श्रीनिवास वर्मा - अवजड उद्योग राज्यमंत्री
  30. हर्ष मल्होत्रा - कॉर्पोरेट अफेअर्स राज्यमंत्री
  31. निमुबेन जयंतीभाई बाम्भनिया - ग्राहक निवारण आणि अन्न वितरण राज्यमंत्री
  32. मुरलीधर मोहोळ - सहकार , नागरी उड्डाण राज्यमंत्री
  33. जॉर्ज कुरियन - अल्पसंख्याक राज्यमंत्री
  34. पबित्रा मार्गारेट - परराष्ट्र राज्यमंत्री

हेही वाचा :

  1. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील सहा मंत्र्यांकडे 'ही' खाती येण्याची शक्यता - Expected Portfolio for Maharashtra
  2. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; सुरक्षा कर्मचारी जखमी - Militants Attack on CM Convoy
Last Updated : Jun 10, 2024, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details