बेंगळुरू: मार्गदर्शी चिट फंड भारतातील सर्वात विश्वासार्ह चिट फंड कंपन्यांपैकी एक आहे. मार्गदर्शी आपल्या शाखांचा सतत विस्तार करत आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे सोमवारी मार्गदर्शी चिटफंडच्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. मार्गदर्शी चिट फंडच्या व्यवस्थापकीय संचालक शैलजा किरण यांनी १२२ व्या शाखेचं आज उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उद्घाटन समारंभात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना शुभेच्छा दिल्या.
चार राज्यांमध्ये शाखा कार्यरत : उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना एमडी शैलजा किरण म्हणाल्या, "मार्गदर्शी चिट फंडची स्थापना १९६२ मध्ये संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांनी केली होती. आज आम्ही चार राज्यांमध्ये कार्यरत आहोत. मार्गदर्शी चिट फंड सध्या आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कार्यरत आहे आणि त्यांच्या १२१ शाखा यशस्वीरित्या सुरू आहेत. चित्रदुर्गात उघडलेली ही नवीन शाखा कंपनीची कर्नाटकातील २६ वी शाखा आहे आणि चार राज्यांमध्ये एकत्रित १२२ वी शाखा आहे". तर नवीन शाखेच्या उद्घाटनादरम्यान, कर्नाटकातील मार्गदर्शी चिट फंडचे संचालक लक्ष्मण राव, मार्गदर्शी चिट फंडचे उपाध्यक्ष बलराम कृष्णा, महाव्यवस्थापक नानजुंड्य ए चंद्रैया, वरिष्ठ अधिकारी विश्वनाथ राव, कर्नाटकातील मार्गदर्शीच्या विविध शाखांचे व्यवस्थापक विजयकुमार, चित्रदुर्ग शाखा व्यवस्थापक प्रवीण बी ए आणि ग्राहक उपस्थित होते.
१०,००० कोटी रुपयांची उलाढाल : या वर्षभरात राज्यात आणखी पाच ते सहा शाखा उघडण्याच्या योजनाही त्यांनी सांगितल्या. कंपनीच्या आर्थिक कामगिरीबद्दल चर्चा करताना एमडी शैलजा किरण म्हणाल्या की, मार्गदर्शी चिट फंडनं चालू आर्थिक वर्षात १०,००० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर कंपनीने पुढील आर्थिक वर्षासाठी १३,००० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलं आहे. ही कंपनी २.५ लाख ग्राहकांना सेवा देते आणि २.५ लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या चिट-फंड योजना देते.
लोकांसाठी एक विश्वासार्ह : "मार्गदर्शी चिट फंड शेतकरी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, व्यापारी, उद्योगपती आणि आयटी आणि इतर उद्योगांमधील व्यावसायिकांसह विविध क्षेत्रातील लोकांसाठी एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार बनला आहे." असं एमडी शैलजा किरण यांनी नमूद केलं.