हातरस (उत्तर प्रदेश) Bus Tempo Road Accident in Hathras :हातरसमधील चांदपा कोतवाली परिसरात शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चांदपा कोतवाली परिसरातील मीताई बायपासवर अलीगड डेपोची बस लोडर टेम्पोला धडकली. टेम्पोमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलं प्रवास करत होते. या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. तर तब्बल 16 जण यात गंभीर जखमी झाले आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त : हातरस अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसंच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
जखमींना रुग्णालयात केलं दाखल :प्रवासी बस ही टेम्पोलो जोरात धडकल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं. पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल, जिल्हा दंडाधिकारी आशिष कुमार, सीओ हिमांशू माथूर पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले.