महाराष्ट्र

maharashtra

लोकसभा अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला ; के सुरेश यांच्यावर केली मात, इतिहासात फक्त तीन वेळा झाली अध्यक्षपदाची निवडणूक - Om Birla vs K Suresh

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 7:18 AM IST

Updated : Jun 26, 2024, 11:50 AM IST

Om Birla vs K Suresh : आज लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली आहे. एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला आणि 'इंडिया'चे उमेदवार के सुरेश यांच्यात लोकसभा अधिवेशन 2024 मध्ये आज सामना रंगला. यात ओम बिर्ला यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे इतिहासात केवळ तीन वेळाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती, त्यात आजच्या निवडणुकीची भर पडली.

Om Birla vs K Suresh
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

नवी दिल्ली Om Birla vs K Suresh : सत्ताधारी एनडीएला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मोठा धक्का बसल्यानं ते बॅकफूटवर आले आहेत. त्यातच आता लोकसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी 'इंडिया' आघाडीनं विरोध दर्शवला. त्यामुळे इतिहासात केवळ चौथ्यांदा लोकसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आज एनडीएचे उमेदवार तथा माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बाजी मारली. ओम बिर्ला यांनी 'इंडिया' आघाडीचे उमेदवार के सुरेश यांच्यावर मात केली.

ओम बिर्ला आणि के सुरेश यांच्यात सामना :लोकसभा अधिवेशन 2024 सुरु झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते भर्तृहरी महताब यांची हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिल्यानंतर आज अधिवेशनात लोकसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी एनडीएकडून माजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा मैदानात उतरवण्यात आलं. तर 'इंडिया' आघाडीनं के सुरेश यांच्या नावावर लोकसभा अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे ओम बिर्ला आणि के सुरेश यांच्यात आज लोकसभा अध्यक्षपदासाठी सामना रंगला. यात ओम बिर्ला यांनी बाजी मारत पुन्हा लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

राजनाथ सिंग यांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन :लोकसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना फोन केला. राजनाथ सिंग यांनी यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभा अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करण्याची विनंती केली. मात्र काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपाध्यक्ष पद दिल्यास बिनविरोध निवड करू अशी अट घातली. त्यामुळे आज लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात एनडीएनं बाजी मारली असून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला.

इतिहासात फक्त तीन वेळा झाली अध्यक्षपदाची निवडणूक :आज लोकसभा अधिवेशन 2024 मध्ये लोकसभा अध्यक्षांची निवडणूक पार पडली. एनडीचे उमेदवार ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीचे उमेदवार के सुरेश यांच्यात हा सामना रंगला. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एनडीएचे नेते आग्रही होते. मात्र राहुल गांधी यांनी लोकसभा उपाध्यक्षपदावर दावा सांगितल्यानं ही निवडणूक झाली. इतिहासात केवळ तीन वेळा लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. यात 1952, 1967 आणि 1976 या वर्षात ही निवडणूक झाली. त्यानंतर आज पुन्हा लोकसभा अध्यक्षपदासाठी निवड पार पडली आहे.

हेही वाचा :

  1. स्वातंत्र्यानंतर प्रथमच लोकसभा सभापती पदावरून सरकार-विरोधकांमध्ये रस्सीखेच, एनडीए की इंडिया आघाडी ठरणार वरचढ? - Lok Sabha speaker election
  2. लोकसभा अधिवेशन 2024; लोकसभेचं उपसभापती पद द्या, राहुल गांधींची मागणी, ओम बिर्लांनी भरला सभापती पदासाठी अर्ज - Lok Sabha Session 2024
  3. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतील ३४ खासदारांचं निलंबन, एकाच दिवसात ६७ खासदार निलंबित
Last Updated : Jun 26, 2024, 11:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details