हैदराबाद Lok Sabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सहाव्या टप्प्यासाठी आज (25 मे) 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागलंय. या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक 223 उमेदवार हे हरियाणातील आहेत. तर किमान 20 उमेदवार जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत.
Live Updates :
- काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी मतदानासाठी पोहोचल्या.
- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी निर्माण भवनातील मतदान केंद्रात मतदान केलं, मतदानानंतर त्यांनी सेल्फी काढला.
- आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवान यांनी दिल्लीत मतदान केलं.
- माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्लीत मतदानाचा हक्क बजावला.
आठ राज्यांमध्ये 9 वाजेपर्यंत 10.82 टक्के मतदान :
- बिहार (8 जागा): 9.66
- हरियाणा (10 जागा): 8.31
- जम्मू आणि काश्मीर (1 जागा): 8.89
- झारखंड (4 जागा): 11.74
- दिल्ली (7 जागा): 8.94
- ओडिशा (6 जागा): 7.43
- उत्तर प्रदेश (14 जागा): 12.33
- पश्चिम बंगाल (8 जागा): 16.54
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
- पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कमलजीत सेहरावत यांनी मतदान केले.
- काँग्रेसचे उमेदवार जेपी अग्रवाल यांनी चांदनी चौक जागेवरून मतदान केलं. यावेळी भाजपा 100 च्या खाली जाऊ शकतो, अशी टीका त्यांनी केली.
- काँग्रेसचे उमेदवार उदित राज यांनी उत्तर पश्चिम मतदारसंघातून 5 लाख मतांनी विजयी होणार असल्याचा दावा केला.
- दिल्ली राज्याचे निवडणूक आयुक्त विजय देव पत्नीसह मतदान केंद्रावर पोहोचले.
- दिल्लीच्या बुरारी आणि देवळीमध्ये मतदानासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा, मतदारांमध्ये दिसून येतोय उत्साह
- दिल्लीतील तुघलकाबाद भागातील बूथवर सकाळी 7 वाजता मतदारांची गर्दी
- परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हे त्यांच्या पत्नीसह मतदान करण्यासाठी तुघलक लेन येथील अटल आदर्श विद्यालयात आले होते. मात्र, येथे मतदार यादीत नाव नसल्यानं त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.
- केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी पत्नी लक्ष्मी पुरीसोबत मतदान करण्यासाठी पोहोचले.
- नवी दिल्लीतील भाजपाचे लोकसभा उमेदवार बन्सुरी स्वराज यांनी झंडेवालान मंदिरात प्रार्थना केली. आम आदमी पक्षाने येथून सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे.
- हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाल लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार मनोहर लाल खट्टर यांनी हरियाणाच्या कर्नालमध्ये मतदान केलंय.
सहाव्या टप्प्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह हरियाणातील सर्व 10 जागांवर मतदान होत आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी आठ जागा, ओडिशाच्या सहा जागा, झारखंडच्या चार आणि जम्मू-काश्मीरच्या एका जागेवरही मतदान होतय.