हैदराबाद keep Your Kidney fit: किडनी हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. युरिया, क्रिएटिनिन, पाणी आणि ॲसिड यासारख्या टाकाऊ तसंच इतर अनावश्यक गोष्टी युरीनद्वारे बाहेर फेकण्यास किडनी मदत करते. किडनीच्या आरोग्यावर दुर्लक्ष केलं तर गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
- खाण्यात मिठाचं प्रमाण कमी करा : आहारात मिठाचे जास्त सेवन केल्यास किडनीला हानी पोहचू शकते. त्यामुळे कमी मीठ असलेल्या पदार्थांचं सेवन करा. कारण यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होईल. नियमित आहारात 2300 मिलीग्रामपेक्षा कमी मीठ असणं आवश्यक आहे.
आहारात हे टाळा
- पॅकिंग केलेले पदार्थ टाळावेत. ताजे अन्न खावे.
- आहारात योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश करावा.
- साखरेचं सेवन जास्त करू नये. कारण यामुळे किडनीचे बारीक फिल्टर खराब होवू शकतात.
- अल्कोहोल मर्यादित करा : किडनी निरोगी ठेवण्याकरिता मद्यपान करू नये. जास्त मद्यपान केल्यानं यकृत, हृदय तसंच मेंदूचे नुकसान होऊ शकते. तसंच गंभीर आरोग्य विषयक समस्या उद्भवू शकतात.
- धूम्रपान टाळा : किडनी निरोगी ठेवण्याकरिता धूम्रपानाचं सेवन करणं टाळा. धूम्रपानाच्या सेवनामुळे किडनीवर दबाव येतो. तसंच रक्तवाहिन्यांवरदेखील परिणाम होतो.
- भरपूर पाणी प्या : पाणी कमी पिल्यानं किडनीच्या इतरही आजारांचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.
- कमी फॉस्फरस असलेले पदार्थ खावेत.