महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेईई मेन परीक्षेचा बदलला पॅटर्न, कट ऑफवर काय होणार परिणाम? - JEE MAIN 2025

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेन 2025 परीक्षेत मोठा बदल केला आहे. परीक्षेच्या पॅटर्ननुसार सर्व प्रश्न अनिवार्य असणार आहेत. जाणून घेऊ, बदललेला परीक्षा पॅटर्न

JEE MAIN 2025
जेईई मेन परीक्षा पॅटर्न (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2024, 10:44 AM IST

कोटा- अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकरिता देशातील सर्वात मोठी प्रवेश परीक्षा असलेल्या जी मेनच्या (JEE MAIN 2025) वेळापत्रकाची विद्यार्थी वाट पाहत आहेत. विशेषत: गणिताचा अभ्यास करणारे 12 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. अशा परिस्थितीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार 2025 ची जेईई मुख्य परीक्षा नवीन पॅटर्ननुसार होणार आहे.

  • शिक्षणतज्ज्ञ देव शर्मा यांनी सांगितलं की, "नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) गुरुवारी रात्री दोन्ही अधिसूचना जारी केल्या आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 2019 पासून जेईई मेन परीक्षा घेत घेण्यात येत आहे. या परीक्षेकरिता लवकरच नोंदणी लवकरच सुरू होईल. परीक्षेच्या बदललेल्या पॅटर्नची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे."

पेपर बीमध्ये पर्याय नसेल- शिक्षणतज्ञ देव शर्मा म्हणाले की, " आता जेईई मुख्य प्रवेश परीक्षेत प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन-बीमध्ये फक्त पाच प्रश्न असणार आहेत. विद्यार्थ्यांना सर्व प्रश्न सोडविणं अनिवार्य असणार आहेत. यापूर्वी विभाग 'ब'मध्ये 10 प्रश्न होते. उमेदवारांना कोणतेही 5 प्रश्न सोडविण्याचा पर्याय होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कोविड-19 दरम्यान उमेदवारांच्या हितासाठी परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्यात आले होते. आता पुन्हा मूळ पद्धतीनं परीक्षा घेण्यात येणार आहे. जेईई-मुख्य प्रवेश परीक्षेचा प्रश्नपत्रिका पॅटर्नमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातून 25 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक विषयाची प्रश्नपत्रिका दोन विभागात केली जाणार आहे. विभाग A मध्ये 20 प्रश्न आणि विभाग B मध्ये 5 प्रश्न असतील. दोन्ही विभागातील सर्व प्रश्न सोडवावे लागतील."

असा असेल कटऑफ : शिक्षणतज्ञ देव शर्मा म्हणाले की, "नवीन अधिसूचनेनुसार जेईई मेन 2025 च्या प्रश्नपत्रिकेत एकूण 75 प्रश्न असणार आहेत. त्याच्या मार्किंग पॅटर्ननुसार योग्य प्रश्नासाठी चार गुण दिले जाणार आहेत. चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण वजा केला जाणार आहे. त्यानुसार एकूण प्रश्नपत्रिका 300 गुणांची असणार आहे. जेईई मुख्य प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पूर्वीप्रमाणे अधिक पर्याय नाहीत. त्यामुळे उमेदवारांना पूर्वीपेक्षा गुण मिळवणे अधिक कठीण होणार आहे. त्यामुळे जेईई मेन अंतर्गत, जेईई अॅडव्हान्स्डसाठीचा कटऑफ कमी होण्याची शक्यता आहे."

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून वेळोवेळी बदल करण्यात येतात. परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटला भेट द्यावी.

हेही वाचा-

  1. जेईई मुख्य सत्र 2 परीक्षेचा निकाल जाहीर, नागपूरचा निलकृष्ण गजरे देशात पहिला - JEE Mains Result
  2. जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील तब्बल 'इतक्या' विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण - JEE Main Results

ABOUT THE AUTHOR

...view details