गोरखपूर Iron Cylinder In Stomach :गोरखपूर येथील शाही ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून एका रुग्णाच्या पोटातून लोखंडी लाटणं बाहेर काढण्यात आलं आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. शिव शंकर शाही यांनी रविवारी (18 फेब्रुवारी) ही शस्त्रक्रिया केली. मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण 32 वर्षांचा असून तो गोरखपूरचा रहिवासी आहे.
लाटणं बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश : पोटदुखीमुळं त्रस्त असणारा रुग्ण रुग्णालयात पोहोचला असता त्याचे अल्ट्रासाऊंड करण्यात आले. अल्ट्रासाऊंडमधून डॉक्टरांसमोर जे चित्र आले ते आश्चर्यचकित करणारं होतं. रुग्णाच्या पोटात चक्क लोखंडी लाटणं असल्याचं अल्ट्रासाऊंडमधून स्पष्ट झालं. त्यामुळं रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत ऑपरेशन करून पोटातील लाटणं बाहेर काढणं हाच डॉक्टरांसमोर उपाय उरला होता. शेवटी डॉ. शाही यांनी आपल्या टीमच्या मदतीनं ऑपरेशन करून रुग्णाच्या पोटातील लोखंडी लाटणं बाहेर काढलं. तसंच रुग्णाची प्रकृती आता स्थिर असून एक-दोन दिवसांत त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
लाटणं पोट्यात जाण्यामागचं कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले : सुरुवातीला रुग्णाला लोखंडी वस्तू पोटात कशी गेली, असा प्रश्न रुग्णाला विचारण्यात आला असता त्यानं हे चुकून घडलं असं म्हणत सत्य लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्य समोर आलं ते ऐकून डॉक्टरही चक्रावले. हा रुग्ण हा लोखंडी लाटण्याचा उपयोग लैंगिक समाधानासाठी करत होता. एकदिवस अशीच कृती करत असतांना ते लाटणं थेट आतमध्ये गेलं. रुग्णानं अवलंबलेली पद्धत हा एक प्रकारचा मानसिक आजार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
2 फूट लांब लाटणं : डॉक्टर शाही यांनी व्हिडीओ आणि फोटो जारी करून ही धक्कादायक घटना सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही चुकीची कृती कोणासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळं नेहमी चुकीचे छंद आणि चुकीच्या कृती टाळण्याचा प्रयत्न करा, असंही ते म्हणाले आहेत. तसंच रुग्णाच्या पोटातून काढण्यात आलेले लाटणं हे 2 फूट लांब आणि 8 सेंटीमीटर रुंद असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- Gorakhpur Kushinagar Highway Accident : गोरखपूर कुशीनगर महामार्गावर उभ्या बसला ट्रकची धडक; सहा प्रवाशांचा मृत्यू
- Bus Truck Accident : लखनौ गोरखपूर महामार्गावर बसची ट्रकला धडक, 7 ठार, 40 जखमी
- Gorakhpur temple Security Attack : गोरखपूर मंदिर सुरक्षारक्षक हल्ला प्रकरणी आरोपीला 7 दिवसाची कोठडी