आगर-मालवा (मध्य प्रदेश) Instagram Love Story : प्रेमाला वय नसतं, असं म्हणतात. म्हणूनच एकमेकांच्या भावना समजून घेणारे लोक सोबती बनतात. तर जग काहीही म्हणत असलं तरी त्यांना त्याची पर्वा नसते. अशीच एक इन्स्टाग्राम लव्हस्टोरी मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातून समोर आलीय. याची संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
इन्स्टाग्रामवरुन सुरू झाली प्रेमकहाणी : मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील सुसनेर परिसर हा बाळूरामच्या प्रेमकथेमुळं चर्चेत आला आहे. "वयाची कोणतीही मर्यादा नाही. जन्माचं बंधन नाही. जेव्हा कोणी प्रेम करतं तेव्हा फक्त हृदयानं पाहावं, या विचाराप्रमाणं वयाची 80 वर्षे वर आणि 34 वर्षीय वधू हा मध्य प्रदेशात चर्चेचा विषय झाला. या दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यांच्या संभाषणाचे प्रेमात रुपांतर झालं.
दोघांनी केलं लग्न : प्रेम जास्त दिवस लपून राहत नाही, असं म्हणतात. बाळूरामची प्रेमकहाणी हळूहळू शहरात आणि नंतर संपूर्ण राज्यात पसरली. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. विवाह करणाऱ्या 34 वर्षीय शीला इंगळे यांनी अमरावतीच्या दर्यापूर येथील रहिवासी आहे. तर वर हे मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील सुसनेर भागातील मगरिया गावातील रहिवासी आहेत. दोघांची सुमारे एक वर्षापासून इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर भेट झाली. एक वर्षाच्या प्रेमानंतर आता पती-पत्नी झाले आहेत. नुकतेच या दोघांनी विवाह कराराद्वारे विवाह केलाय.
प्रेमकथा व्हायरल : इन्स्टाग्रामवर सुरू झालेली ही प्रेमकहाणी आता लग्नात रुपांतरित होऊन संपूर्ण जगासमोर आलीय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 'दोघांचं लग्न झालं असून ते खूप आनंदी आहेत. तिला बरं वाटत आहे. तिला जीवनसाथी मिळाल्याचा आनंदही आहे', असं त्यांनी म्हटलंय. दोघांनीही एक विवाह करार तयार केलाय. या करारपत्रावर दोघांचे फोटो आणि स्वाक्षऱ्या आहेत. तसंच आम्ही आमच्या खुशीनं हे लग्न करत असल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
हेही वाचा :
- प्रेमविवाहाला कथित मदत करणं बेतलं जिवावर, काकानंच पुतण्याच्या अंगावर घातली फिल्मीस्टाईलनं जीप, चारवेळा चिरडून केली हत्या - Sambhajinagar Murder