मुंबई T20 World Cup 2024 Final:राष्ट्रपती दौपदी मुर्म यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं की, "T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन. कधीही हार न मानत भारतीय संघानं कठीण परिस्थितीचा सामना केला. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्यं दाखवलं. अंतिम सामन्यातील हा अभूतपूर्व विजय होता. शाब्बास, टीम इंडिया! तुमचा आम्हाला अभिमान आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचं कौतुक केलं. त्यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, " आपला भारतीय संघ अतुलनीय कामगिरी करत टी20 वर्ल्ड कप घेऊन आली आहे. टीमच्या ऐतिहासिक कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारतानं संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. देशातील प्रत्येक भारतीयांचं मन भारतीय संघानं जिंकलं आहे. आज 140 कोटी भारतीयांना तुमच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे. तुम्ही खेळाच्या मैदानासह लाखो भारतीय नागरिकांचे मने जिंकली आहेत."
विजय खरोखर ऐतिहासिक-गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील टीम इंडियाचं अभिनंदन केलं. हा क्षण आपल्या देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले "आमच्या दमदार फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनं, गोलंदाजांच्या अथक परिश्रमानं विजय मिळविला. हा विजय खरोखर ऐतिहासिक आहे."
क्रिकेट संघाना केला देशाचा गौरव-लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत टीमचं अभिनंदन केलं. "नेत्रदीपक विश्वचषक विजयाबद्दल आणि संपूर्ण स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी केल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन! सूर्या, किती छान झेल होता! रोहित, हा विजय तुझ्या नेतृत्वाचं उदाहरण आहे. राहुल, मला माहीत आहे की टीम इंडिया तुझ्या मार्गदर्शनाला मुकणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं देशाचा गौरव केला आहे."
चक दे इंडिया-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील टीम इंडियाचं अभिनंदनं केलं आहे. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटले, " दक्षिण आफ्रिका संघाला धूळ चारत प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघानं एक नेत्रदीपक विजय मिळविला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. चक दे इंडिया..."
संपूर्ण संघाच्या कार्याला सलाम- "सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा तसचं ICC T20 विश्वचषकात भारताचा उल्लेखनीय विजय, म्हणत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अभिनंदन केलंय. " ही एक अविस्मरणीय कामगिरी भारतीयांच्या हृदयात नेहमी राहील. भारतीय क्रिकेट संघाची अतुलनीय कामगिरी त्यांची अफाट क्षमता आणि प्रयत्न दर्शवते. रोहित शर्माची कर्णधारपदासाठीची भूमिका आणि संपूर्ण संघाच्या कार्याला सलाम, पुन्हा एकदा अभिनंदन! खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा." माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी विराट कोहली, सुर्यकुमार, रोहित शर्मा आणि भारतीय संघाला टॅग करत अभिनंदन केले.
देश या विजयानं भारावून गेला-उममुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील टीम इंडियाचं अभिनंदन केलंय. त्यांनी म्हटले, " भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. तब्बल सतरा वर्षांनंतर भारतीय क्रिकेट संघानं टी-ट्वेंटी वर्ल्डकप जिंकून देशवासियांना दिलेला आनंद अवर्णनीय आहे. संपूर्ण देश या विजयानं भारावून गेला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं केलेली कामगिरी जगज्जेत्या सारखीच आहे. विराट कोहली, अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी दमदार पण संयमी खेळी करुन सर्वाधिक धावांचा विक्रम रचला. संघातल्या प्रत्येक खेळाडूचं योगदान, समस्त देशवासियांच्या शुभेच्छांमुळेच हे यश मिळालं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं हे यश देशातील क्रिकेटसह देशातील अन्य खेळांना संजीवनी तसंच खेळाडूंना प्रेरणा देईल. आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचं मी मनापासून अभिनंदन करतो."
हेही वाचा
- भारतीय संघाच्या आनंदावर विरजण; अंतिम सामन्यानंतर कोहलीचा टी-20 क्रिकेटला अलविदा - Virat Kohli T20 Retirement
- भारताचा 'हार्दिक' विजय... 17 वर्षांनी टीम इंडिया टी-20 चा 'विश्वविजेता' - T20 World Cup Final