महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीसोबत बाईकवर गेली होती फिरायला - Gang Rape On Spanish woman

Gang Rape On Spanish woman : पतीसोबत बाईकवर फिरायला गेलेल्या परदेशी महिलेवर अनोळखी नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना झारखंडमधील दुमका इथं शुक्रवारी रात्री घडली.

Gang Rape On Spanish woman
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 11:17 AM IST

रांची Gang Rape On Spanish woman : पतीसोबत बाईकवर फिरायला गेलेल्या परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना झारखंडमधील दुमका या शहरात शुक्रवारी रात्री घडली आहे. घटनेची माहिती मिळताच हंसदिहा पोलीस ठाण्यातील जवानांनी तीन संशयिताना ताब्यात घेतलं आहे. दुमकाचे पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार यांनी रात्री उशीरा घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेऊन तत्काळ पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

सरैयाहाट प्राथमिक आरोग्य केंद्र

पतीसोबत बाईकवरुन फिरायला गेली होती महिला :ही पीडित महिला आपल्या पतीसह बाईकवरुन फिरायला गेली होती. यावेळी ही परदेशी महिला आणि तिचा पती दुमकावरुन भागलपूरकडं जात होते. सुनसान रात्रीची वेळ असल्यानं या महिलेनं आणि तिच्या पतीनं निर्जनस्थळी थांबण्याचा निर्णय घेतला.

हंसदिहा पोलीस ठाणे

हंसडीहा बाजाराजवळ निर्जनस्थळी लावला तंबू :आपल्या पतीसोबत फिरायला निघालेल्या या महिलेनं दुमकावरुन भागपूरकडं बाईकनं जाणं पसंत केलं होतं. मात्र रात्री बारा वाजता त्यांनी हंसडीहा बाजाराच्या अगोदर एका निर्जनस्थळावर तंबू ठोकून थांबण्याचा निर्णय घेतला. यावेळी ही महिला या तंबूत झोपली होती. मात्र रात्री परिसरातील काही नराधमांनी या महिलेवर बलात्कार केला.

बलात्कार करुन मारहाण केल्यानं महिला गंभीर जखमी :महिला तंबूत झोपलेली असताना या नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. यावेळी महिलेनं या नराधमांना प्रतिकार केल्यानं तिला नराधमांनी बेदम मारहाण केली. त्यामुळं घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडित परदेशी महिलेला सरैयाहाट प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. या महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्यानं परिसरात मोठी दहशत पसरली आहे. याबाबत दुमकाचे पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार यांना विचारलं असता त्यांनी, "अत्याचाराची घटना झाली आहे, पुढील तपास सुरू आहे," इतकीच माहिती दिली आहे. याबाबत जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. पोलिसांनी तीन नराधम ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडं घटनेबाबत चौकशी सुरू आहे.

हेही वाचा :

  1. वॉर्ड बॉयचा आयसीयूमधील रुग्ण महिलेवर बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
  2. धक्कादायक! लोहरदगामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक
  3. दोन अल्पवयीन मुलींवर प्रार्थनास्थळात बलात्कार; चॉकलेटचं आमिष दाखवून केला अत्याचार, आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details