नवी दिल्ली :लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या असून भारतीय जनता पक्ष आक्रकमपणं रणनीती आखथ आहेत. तसंच इतर विरोधी पक्षांचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झाले आहेत. अलीकडच्या काळात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांचे प्रमुख नेते भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत.
- महाराष्ट्र-
- नारायण राणे : नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. राणे 2005 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये सामील झाले. राणेंनी 2017 मध्ये काँग्रेस सोडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला होता. आपल्या राजकीय कारकिर्दीत पुढं जाताना त्यांनी 2018 मध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजपा) पाठिंबा जाहीर केला. 15 ऑक्टोबर 2019 रोजी राणे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही त्यात विलीन केला.
- अशोक चव्हाण : काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून अशोक चव्हाण यांनी ओळख आहे. यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करत राज्यसभेत विजय मिळवलाय. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री एस.बी चव्हाण यांचे पुत्र आहेत. अशोक चव्हाण डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
- आंध्र प्रदेश- किरण कुमार रेड्डी :आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी एप्रिल 2023 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय. याआधी ते काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जात होते. अविभाजित आंध्र प्रदेशचे शेवटचे मुख्यमंत्री रेड्डी यांनी राज्याच्या विभाजनाला कडाडून विरोध केला होता. आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण निर्माण करण्याच्या तत्कालीन यूपीए सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ 2014 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
- पंजाब- कॅप्टन अमरिंदर सिंग : कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. 1980 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. सिंग हे 2002 ते 2007 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्रीही होते. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अमरिंदर सिंग यांनी 2021 मध्ये पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली होती. तसंच विधानसभा निवडणुकीत सर्व 117 जागांवर निवडणूक लढवली होती. यानंतर त्यांनी 2022 मध्ये पीएलसी पक्षाची स्थापना करत भारतीय जनता पक्षात विलीन केला होता.
- कर्नाटक- एसएम कृष्णा :कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, एस.एम. कृष्णा यांनी मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. कर्नाटकात त्यांची काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते म्हणून ओळख होती. ऑक्टोबर 1999 ते मे 2004 दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मात्र, सध्या ते भाजपामध्ये फारसे सक्रिय नाहीत.
- गोवा- दिगंबर कामत : गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. पण 1994 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2005 मध्ये, सार्वमताच्या निवडीला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पण 2012 मध्ये त्यांनी भाजपाच्या बहुमताच्या सरकारला पाठिंबा दिला होता.
- उत्तराखंड- विजय बहुगुणा : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, विजय बहुगुणा हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते होते. मात्र त्यांनी मे 2016 मध्ये राज्यातील आठ माजी आमदारांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विजय बहुगुणा उत्तर प्रदेशचे देखील मुख्यमंत्री देखील होते.
- नारायण दत्त तिवारी :उत्तर प्रदेशचे तीनदा तसंच उत्तराखंडचं एकदा मुख्यमंत्री होते. त्यांनी 1951 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी प्रजा समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. 1963 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. 2017 मध्ये नारायण दत्त तिवारी यांनी त्यांचा मुलगा रोहित शेखर तसंच पत्नी उज्ज्वला यांच्यासह भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
- उत्तर प्रदेश- जगदंबिका पाल :जगदंबिका पाल यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून 15व्या लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांनी 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 1998 मध्ये, जेव्हा उत्तर प्रदेशच्या तत्कालीन राज्यपालांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त केलं, तेव्हा जगदंबिका पाल तीन दिवसांसाठी राज्याचे मुख्यमंत्री बनले होते.
- अरुणाचल प्रदेश- पेमा खांडू : पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीए) च्या 32 आमदारांसह पेमा खांडू यांनी डिसेंबर 2016 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पेमा खांडू यांचें सरकार जुलै 2016 पासून अरुणाचल प्रदेशमध्ये सत्तेवर आहे.