महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 9:56 AM IST

ETV Bharat / bharat

ट्रकनं रिक्षाला चिरडलं; परराज्यात कामासाठी निघालेल्या 5 मजुरांवर काळाचा घाला, 8 गंभीर - Road accident in Garhwa

Road accident in Garhwa : परराज्यात कामासाठी जाणाऱ्या मजुरांच्या रिक्षाला भरधाव ट्रकनं जोरदार धडक दिली. या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला, तर 8 मजूर गंभीर जखमी झाले आहेत.

Road accident in Garhwa
ट्रक आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात (ETV Bharat)

रांची Road accident in Garhwa :ट्रक आणि ऑटो रिक्षात झालेल्या भीषण अपघातात पाच मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात इतर आठ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील नॅशनल हायवे 75 वर नागरुनटरी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली. सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी गढवा इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आल. अपघातात मृत झालेले मजूर हे नागरुनतारी पोलीस ठाण्याच्या परिसरातील सीरिया तोमर गावचे रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बिमलेश कुमार कनोजिया (42), अरुण भुईया (30), बिकेश भुईया (20), राजा कुमार (21) आणि राजकुमार भुईया (53) अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत.

मजूर परराज्यात निघाले होते कामाला :गढवा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 5 मजुरांचा मृत्यू झाला, तर 8 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात ठार झालेले मजूर हे परराज्यात कामासाठी निघाले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांच्यावर काळानं घाला घातला. हे मजूर गढवा जिल्ह्यातून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी नगररुनटरी रेल्वे स्थानकावर शक्तीपुंज एक्स्प्रेस पकडणार होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 75 वरील पाल्हे पुलाजवळ रिक्षानं जात असताना त्यांना भरधाव येणाऱ्या ट्रकनं धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की रिक्षा काही अंतरावर जाऊन पडला.

अपघातात 5 जणांचा मृत्यू 8 मजूर गंभीर :ट्रकनं धडक दिल्यानं रिक्षातील 5 मजुरांचा मृत्यू झाला. तर 8 मजूर या अपघातात गंभीर जखमी झाले. या गंभीर मजुरांवर गढवा इथल्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 5 मजुरांना रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर माहिती मिळताच या मजुरांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला. हे मृत मजूर एकाच गावातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. जखमी मजुरांमध्ये सीरिया टोंगार, राम प्रसाद राम ( वय 35 वर्ष), छोटू लाला भुईया ( वय 35 वर्ष ), उमेश भुईया ( वय 35 वर्ष ), राकेश भुईया ( वय 36 वर्ष ), मेराज अन्सारी ( वय 27 वर्ष ) आणि संजय भुईया यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

  1. पुणे अपघातामधील आरोपींना वाचविण्याकरिता सरकारकडून दुसऱ्यांदा प्रयत्न सुरू; अनिल देशमुखांनी 'हे' केले आरोप - Pune Porsche Accident
  2. मेळघाटात खासगी बसला अपघात, दहा प्रवासी गंभीर जखमी - Private bus Accident in Melghat
  3. कोल्हापुरात भीषण अपघात; भरधाव कारने दुचाकींना उडविले, चौघांचा मृत्यू - Kolhapur Accident News

ABOUT THE AUTHOR

...view details