नवी दिल्ली Union Interim Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. लोकसभा निवडणूक 2024 जवळ आल्याने हा अंतरिम अर्थसंकल्प होता. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चर्चा होत असतानाच त्यांच्या साडीचीही चर्चा होत आहे. 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना, निर्मला सीतारामन यांनी पट्टू सिल्क पॅटर्न असलेली लाल साडी नेसली होती. तर यंदा त्यांनी निळ्या आणि क्रीम रंगाची टसर साडी नेसली आहे.
सीतारामन दरवर्षी परिधान करतात नवीन पॅटर्न : दरवर्षी जेवढी अर्थसंकल्पाची चर्चा होते, तेवढीच चर्चा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्या दिवशी परिधान केलेल्या साडीचीही होते. प्रत्येक वर्षी अर्थसकंल्प सादर करताना निर्मला सितारामन या खास डिझाईन केलेली साडी परिधान करत असल्याचं दिसून आलंय. कधी हँडलूम सिल्कची साडी, तर कधी मरून किंवा गडद चॉकलेटी वर्कआउट असेलेली साडी सीतारामन यांनी परिधान केली होती.
अंतरिम अर्थसंकल्प 2024 : गेल्या काही वर्षांत आपण अर्थमंत्र्यांना अर्थसंकल्पाच्या दिवशी चमकदार रंगाची साडी नेसलेले पाहिले आहे. अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करण्याच्या काही तास आधी निर्मला सीतारामन अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयात पोहोचल्या असताना, त्यांनी निळ्या आणि क्रीम रंगाची टसर साडी परिधान केली होती. संपूर्ण साडीवर क्रीम रंगाचा कांथा वर्क आहे. निळा रंग हा ज्ञानाचा तर क्रीम रंग हा एकाग्रतेचं प्रतिक मानलं जातं.
अर्थसंकल्प 2023 :2023 चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी टेम्पलची साडी नेसली होती. ही साडी सहसा कापूस, रेशीम किंवा मिश्रणाने बनवली जाते. या प्रकारची साडी खास प्रसंगी नेसली जाते. या साडीची चमक लाल असते.
अर्थसंकल्प 2022 : निर्मला सीतारामण यांनी 2022 च्या अर्थसंकल्पावेळी चॉकलेटी रंगाची साडी नेसली होती. ज्यात सुरक्षेचा संदेश दिला होता. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेकदा नोटांशी जुळणारी साडी नेसतात. त्यांनी क्रीम कलरची मंगलागिरी साडीही नेसलेली दिसली होती. 20 रुपयांच्या नोटेशी जुळणार्या हिरव्या मंगलगिरी साड्यांचा देखील त्यांनी 2019 मध्ये नेसली होती. त्यानंतर आता संबळपुरीच्या साडीची चर्चा होताना दिसत आहे.
अर्थसंकल्प 2021 : निर्मला सीतारामण यांनी कोविडनंतरच्या बजेटमध्ये लाल रंगाची साडी नेसली होती. शक्ति आणि संकल्पाचा संदेश या साडीमधून त्यांनी दिला होता. कायमच अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या साडीची चर्चा होताना दिसते. निर्मला सीतारमण यांनी तपकिरी बॉर्डरची लाल रंगाची साडी परिधान केली होती. दरवर्षी सीतारमण अर्थसंक्लप सादर करताना लाल शेडच्या साड्या परिधान करताना दिसतात. गेल्या 5 वर्षात त्यांच्या साड्यांची चर्चा होताना दिसते. यंदाच्या अर्थसंकल्पवेळी सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साडी परिधान केली होती.
हेही वाचा :
- कसा असेल फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस; वाचा राशीभविष्य
- कोण आहेत 'झारखंड टायगर' चंपाई सोरेन? हेमंत सोरेन यांच्या जागी बनणार राज्याचे नवे मुख्यमंत्री