नवी दिल्ली DRDO Team Submits Report : पाकिस्तानला जाणारं चीनचं जहाज भारतीय सुरक्षा यंत्रणेनं मुंबईतील नाव्हा शेवा बंदरात पकडलं होतं. या जहाजातून पाकिस्तानला क्षेपणास्त्राचे विविध भाग नेण्यात येत असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला होता. त्यामुळं भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या ( DRDO ) पथकानं सोमवारी आपला अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाव्हा शेवा बंदरात पकडलं होतं चीनी जहाज :पाकिस्तानला जाणारं 'सीएमए सीजीएम अटिला' हे जहाज भारतीय सुरक्षा यंत्रणेनं मुंबईतील नाव्हा शेवा या बंदरात 23 जानेवारीला अडवलं होतं. हे जहाज कराचीला जात होतं. या जहाजात इटालियन कंपनीचं कॉम्प्यूटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन ( CNC ) असल्याचं सुरक्षा यंत्रणांना आढळून आलं होतं. पाकिस्तानच्या कॉसमॉस इंजिनियरिंग कंपनीकडं हे मशीन जाणार होतं. कॉमॉस इंजिनियरिंग ही कंपनी पाकिस्तानला संरक्षण साहित्य पुरवठा करते. त्यामुळं भारतीय सुरक्षा यंत्रणेनं या मशीनची तपासणी केली. पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात या मशीनचा वापर केला जाऊ शकतो, त्यामुळं भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.