चेन्नई : फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री उशिरा पुडुचेरीनजीक धडकले. भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळानं रात्री 10:30 ते 11:30 च्या दरम्यान पुडुचेरीजवळील किनारपट्टी ओलांडली. तर पुढील काही तासात हे चक्रीवादळ कमकुवत होऊन पश्चिम-नैऋत्य दिशेनं सरकेल, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय.
भारतीय हवामानशास्त्र विभागानं एक्सव मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर रोजी IST 2330 तासांनी पुडुचेरीजवळ 12.0 अंश उत्तर अक्षांश आणि रेखांश 79.8 अंश पूर्वेजवळ उत्तरेकडील तटीय तामिळनाडू आणि पुडुचेरीवर केंद्रित होते. ते हळूहळू पश्चिम-नैऋत्येकडं सरकत राहील. पुढील 3 तासांत हळूहळू कमकुवत होईल. दरम्यान, फेंगल चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांना चेंगलपट्टू जिल्ह्यातील कल्पक्कमजवळील मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलं. शनिवारी रात्री चेन्नई महापालिकेचे काही हजार कर्मचारी, अभियंते वादळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज होते. यावेळी राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसानं साचलेल्या पाण्याचा 1686 मोटरपंपांच्या सहाय्यानं निचरा करण्यात आला.
चक्रीवादळ कमकुवत होण्याची शक्यता : आयएमडीनं शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता अद्ययावत केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ताज्या निरीक्षणावरून असं दिसून आलंय की चक्रीवादळाचा पुढचा भाग जमिनीवर आलाय. पुढील 3 ते 4 तासांत हे वादळ पश्चिम-नैऋत्य दिशेला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळं उत्तर तामिळनाडू-पुडुचेरी किनारा ओलांडून पुडुचेरीजवळ 70-80 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
सैन्यदलाकडून 100 जणांची सुटका-दक्षिण भारत क्षेत्रांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय सैन्य दलाच्या चेन्नई गॅरिसन बटालियननं आज पहाटे पूरग्रस्त भागात बचावकार्य केले. मेजर अजय सांगवान यांच्या नेतृत्वाखालील सैन्यदलाचे बचाव पथक पुद्दुचेरीला पोहोचले. कृष्णा नगरमधील काही भागातील पाण्याची पातळी जवळपास पाच फुटांपर्यंत वाढल्याने सुमारे 500 घरांतील रहिवासी अडकून पडले आहेत. सकाळी 6:15 वाजता सैन्यदलाच्या बचावपथकानं पहिल्या दोन तासात 100 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
- कोकणसह रायगड किनारपट्टीवर हलक्या व मध्यम पावसाची शक्यता : फेंगल चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर आणि रायगड जिल्ह्यात जास्त परिणाम होणार नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांना आणि नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
हेही वाचा -
- फेंगल चक्रीवाद; तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागानं दिला 'हा' इशारा