रांची -छत्तीसगडमधील ऑर्केस्ट्रा कलाकारावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील महिला ऑर्केस्ट्रा कलाकाराला पलामू येथील विश्रामपूर येथे काही स्थानिक लोकांनी कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद येथं नियोजित कार्यक्रम झाला. कार्यक्रमावरून महिला ऑर्केस्ट्रा कलाकार परतत असताना काही तरुणांनी त्यांना अमली पदार्थ असणारे पदार्थ खाऊ घातले. त्यानंतर महिला कलाकारावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी महिलेला रस्त्यावरच सोडून दिले.
अद्याप दोन आरोपी फरार -रस्त्यावर पीडितेची झालेली वाईट अवस्था पाहून स्थानिक लोकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पीडितेनं शुद्धीवर येताच घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती समोर आली. विश्रामपूर ठाण्यातील पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी अजय आणि बिंदेश्वर यांना अटक केली. या प्रकरणात अद्याप दोन आरोपी फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी परिसरात छापेमारी सुरू केलीय. आरोपींनीच महिला कलाकारांना छत्तीसगडमधील कार्यक्रमासाठी आणले होते. विश्रामपूर ठाण्याचे पोलीस अधिकारी सौरभ चौबे म्हणाले, आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दुमका येथं स्पॅनिश महिलेवर बलात्कार-पतीसोबत दुचाकीवरून जगभरात भ्रमंती करणाऱ्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. ही घटना झारखंडमधील दुमका या शहरात शुक्रवारी रात्री घडली. ऑर्केस्ट्रा कलाकारावरील महिलेच्या बलात्कारानंतर झारखंडमधील कायदा व सुव्यवस्थेची चिंताजनक स्थिती पुन्हा अधोरेखित झाली. दुमकाचे पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या ममता कुमारी दुमका यांनी पीडितेशी बोलून घटनेची माहिती घेतली.
हेही वाचा-