नवी दिल्ली Narendra Modi Motion Of Thanks :पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित केलं होतं.
भाजपानं व्हीप जारी केला : भारतीय जनता पार्टीनं लोकसभेतील आपल्या सर्व खासदारांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे. सभागृहाच्या कामकाजाच्या यादीनुसार, लोकसभा खासदार रवनीत सिंह आणि राम शिरोमणी वर्मा 14 डिसेंबर 2023 रोजी सभागृहाच्या बैठकींना सदस्यांच्या अनुपस्थितीबद्दल समितीच्या बाराव्या बैठकीचा अहवाल सादर करतील. खासदार पीपी चौधरी आणि एनके प्रेमचंद्रन 'प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक दहशतवादाचा मुकाबला' या विषयावर परराष्ट्र व्यवहार समितीचा (17वी लोकसभा) 28 वा अहवाल सादर करतील.
जम्मू-काश्मीरच्या प्राप्ती-खर्चाचे तपशील सादर होणार : भाजपाचे खासदार राजीव चंद्रशेखर हे कौशल्य विकास मंत्रालयाशी संबंधित 'प्रशिक्षण महासंचालनालयाचे कामकाज' या विषयावरील कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास विषयक स्थायी समितीच्या 49 व्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत विधान करतील. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या वर्षासाठी जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या अंदाजे प्राप्ती आणि खर्चाचे तपशील सादर करतील.
'हे' विधेयकं सादर करणार : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा पुन्हा सुरू होईल. खासदार अशोक कुमार मित्तल आणि प्रकाश जावडेकर विभागाच्या अठ्ठावीसव्या अहवालाची प्रत मांडतील. यामध्ये, परराष्ट्र व्यवहारावरील संबंधित संसदीय स्थायी समिती (सतरावी लोकसभा) आज प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक दहशतवादाशी मुकाबला करण्याचा विषय सभागृहात मांडणार आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज पाणी (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, 1974 मध्ये सुधारणा करण्यासाठी जल (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) दुरुस्ती विधेयक, 2024 राज्यसभेत सादर करणार आहेत.
हे वाचलंत का :
- अर्थसंकल्पात विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची 'हमी' - मोदी
- पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसन्मान पुरस्कार जाहीर, साताऱ्यात शिवजयंतीदिनी होणार वितरण