महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"भाजपावाले श्रीरामालाही म्हणाले असते भाजपा जॉईन कर नाहीतर..."; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील भाषणात भाजपावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केलीय. तसंच, या काळात प्रभू राम असते तर त्यांच्यासमोरही ईडी किंवा जेल असे पर्याय ठेवले असते, असा गंभीर आरोप भाजपावर केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 5:47 PM IST

Updated : Mar 9, 2024, 6:05 PM IST

नवी दिल्लीArvind Kejriwal : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री आतिशी यांनी (दि. 4 मार्च) रोजी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. त्यावर तीन दिवस चर्चा झाली. आज शनिवार (दि. 9 मार्च) रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भाषणानंतर आवाजी मतदानाने अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पावरील भाषणात केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. देशासमोर विकासाचं मॉडेल आणि विनाशाचं मॉडेल असल्याचं ते म्हणाले. दोन्ही मॉडेल्स निवडणुका जिंकतात, आता देशातील जनतेने ठरवायचं आहे की, त्यांना देशाचा विकास हवा आहे की विनाश. दरम्यान, आजच्या काळात प्रभू श्रीराम असते तर भाजपाच्या लोकांनी त्यांच्या घरीही ईडी आणि सीबीआय पाठवली असती असं म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर यावेळी जोरदार घणाघात केलाय.

'जितके समन्स पाठवणार तितक्या शाळा बांधणार' : जर प्रभू राम या युगात अस्तित्त्वात असता : भगवान राम जर या काळात हयात असते तर भाजपाने त्यांच्या घरी ईडी पाठवली असती, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. भाजपामध्ये या नाहीतर तुरुंगात जा असे पर्याय त्यांनी रामापुढे ठेवले असते असंही केजरीवाल म्हणाले आहेत. यावेळी, तुम्ही समन्स पाठवाल तितक्या शाळा आम्ही बांधू असा टोलाही केजरीवाल यांनी यावेळी लगावला आहे. 'मला आठ समन्स आले आहेत, मी तेवढ्याच शाळा बांधणार आहे.' असंही ते यावेळी म्हणाले आहेत. आज देशभरात परिस्थिती पाहिली तर आपल्या विरोधात जो आहे त्याला ईडी, सीबीआय, यांच्या जाळ्यात अडकवण्याचा मोठा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे असा थेट आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

भाजपने विनाशाचा आदर्श ठेवला : मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, 'देशात दोन घटना घडल्या. पहिली घटना 2014 मध्ये केंद्रात भाजपाने सरकार स्थापन केलं होतं. 2015 मध्ये दिल्लीत आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. दोन्ही सरकारं बहुमताने स्थापन झाली. दोन्ही सरकारने निवडणुका जिंकण्याची हमी देणारे दोन मॉडेल समोर ठेवले आहेत. एक विकासाचं मॉडेल आणि दुसरं विनाशाचं मॉडेल. त्यामध्ये आमच्या पक्षाने काम केले आणि विकासाचे मॉडेल ठेवलं असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, केजरीवाल म्हणाले, भाजपाने विनाशाचा आदर्श ठेवला आहे. त्याचे दोन भाग आहेत आणि पहिला म्हणजे सर्व पक्षांचा नाश करणं. विरोधकांच्या विरोधात एजन्सी तैनात करा. त्यांचे सरकार पाडा. दुसरा भाग म्हणजे, विरोधी सरकार काम करत असेल तर त्यामध्ये आडकाठी निर्माण करणं हे त्यांचे दोन कामं आहेत. हे सगळं करण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची कमी नाही असंही ते म्हणालेत.

केजरीवाल यांना किती समन्स : 2 नोव्हेंबर 2023 त्यानंतर 21 डिसेंबर 2023, 3 जानेवारी 2024, 17 जानेवारी 2024, 2 फेब्रुवारी 2024, 22 फेब्रुवारी 2024, 26 फेब्रुवारी 2024, 4 मार्च 2024, इतक्यावेळा अरविंद केजरीवाल यांना ईडीककडून समन्स पाठवण्यात आलं आहे. ते यातील एकाही तारखेला ईडीसमोर हजर झालेले नाहीत. दरम्यान 12 मार्चला ईडीने केजरीवाल यांना हजर राहण्यास सांगितलं. मात्र, आपल्याला 12 मार्चनंतरची तारीख देण्यात यावी. आपण व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे आपल्याशी संपर्क करू असं केजरीवाल यांच्याकडून ईडीला कळवलं आहे.

Last Updated : Mar 9, 2024, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details