महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयाची दिलेली मुदत संपताच बिल्कीस प्रकरणातील दोषींचं आत्मसमर्पण - Bilquis Bano

Bilquis Bano case convicts surrendered : बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींनी काल रविवार 21 जानेवारी रोजी रात्री तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केलं. सर्वोच्च न्यायालयानं या दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं.

Bilquis Bano case convicts surrender
बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचं अखेर आत्मसमर्पण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 9:52 AM IST

नवी दिल्ली :Bilquis Bano case convicts surrendered : बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची शिक्षा गुजरात सरकारनं रद्द केली होती. त्यानंतर बिल्कीस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात त्या निकालाला आव्हान दिलं होत. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं गुजरात सरकारचा निर्णय रद्द करत या दोषींना 21 जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने 8 जानेवारीला महत्त्वपूर्ण निकाल दिला : सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मुदतीनंतर दोषींनी रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा उप कारागृहात त्यांनी आत्मसमर्पण केलंय. या प्रकरणातील सर्व 11 दोषींनी तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केलं. 21 जानेवारीच्या मध्यरात्रीपूर्वी ते तुरुंगात पोहोचले. 21 जानेवारी ही आत्मसमर्पण करण्याची अंतिम मुदत होती. स्थानिक गुन्हे शाखेचे एन. एल देसाई यांनी सांगितलं, की रविवारी रात्री उशिरा सर्व 11 दोषींनी तुरुंग प्रशासनासमोर आत्मसमर्पण केलं. या प्रकरणातील 11 दोषींची पुन्हा तुरुंगात रवानगी करणारा सर्वोच्च न्यायालयानं 8 जानेवारीला महत्त्वपूर्ण निकाल दिला होता.

विनंती कोर्टाने फेटाळून लावली : आपल्या विवेकबुद्धीचा गैरवापर केल्याबद्दल न्यायालयानं गुजरात राज्याला फटकारलं होतं. राज्य सरकारनं 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनी मुदतीपूर्वी सुटका केलेल्या दोषींना दोन आठवड्यांच्या आत तुरुंगात परतण्याचे आदेश त्यावेळी देण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी दोषींना आत्मसमर्पण करण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती फेटाळली. त्यांना रविवारपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितलं.

मुलीसह कुटुंबातील सात जणांची हत्या : फेब्रुवारी 2002 मध्ये गोध्रा ट्रेन जाळल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीच्या वेळी बिल्किस बानो 21 वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती. दंगलीतून सुटण्याच्या प्रयत्नात तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या काळात त्यांच्या तीन वर्षांच्या मुलीसह त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली. या 11 दोषींमध्ये बकाभाई वोहनिया, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, गोविंद, जसवंत, मितेश भट्ट, प्रदीप मोरधिया, राधेश्याम शाह, राजूभाई सोनी, रमेश आणि शैलेश भट्ट यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

1 Bilkis Bano Case बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील 11 दोषींची सुटका

2 Bilkis Bano Case बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींचे स्वागत करणे अयोग्य, देवेंद्र फडणवीस

3 बिल्किस बानो प्रकरणावरून राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details