महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुर्नूल 'ईनाडू' कार्यालयावर आमदार कटासनी यांच्या समर्थकांनी केला हल्ला; पाहा व्हिडिओ

Attack on Eenadu Local Office in Kurnool : आंध्र प्रदेशमधील वायएसआरसीपी आमदाराच्या समर्थकांनी ईनाडू वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला केल्याची घटना आज (20 फेब्रुवारी) घडली. यावेळी तोडफोड करून घोषणाबाजी करण्यात आली.

attack on eenadu local office in kurnool by panyam mla katasani rambhupal reddy followers
कुर्नूल 'ईनाडू' कार्यालयावर आमदार कटासनी यांच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 9:32 PM IST

कुर्नूल 'ईनाडू' कार्यालयावर आमदार कटासनी यांच्या कार्यकर्त्यांनी केला हल्ला; पाहा व्हिडिओ

कुर्नूल Attack on Eenadu Local Office in Kurnool :पनयमचे आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थकांनीकुर्नूल 'ईनाडू' स्थानिक कार्यालयावर हल्ला केला. वायएसआरसीपी आमदाराबाबत छापण्यात आलेल्या बातमीचा त्यांना राग आला. त्यामुळे त्यांनी हा हल्ला केल्याचं बोललं जातंय. या हल्ल्यात 500 हून अधिक समर्थक सहभागी होते. त्यांनी कार्यालयावर दगडफेक केली. एवढेच नव्हे तर संतापलेल्या समर्थकांनी कार्यालयातील फर्निचरची नासधूस झाली. तसंच यावेळी आमदारांच्या समर्थकांनी 'जय जगन, जय कटासनी' च्या घोषणाही दिल्या. वायएसआरसीपी समर्थकांनी यावेळी 'ईनाडू'च्या प्रतीही जाळल्या.

कार्यालयावर करण्यात आली दगडफेक : मंगळवारी (20 फेब्रुवारी) वायएसआरसीपीचे कार्यकर्ते आणि समर्थक 'ईनाडू' वृत्तपत्राच्या स्थानिक कार्यालयाबाहेर जमले. त्यांनी अचानक जोरदार घोषणाबाजी केली. मोठ्या संख्येनं जमलेल्या समर्थकांनी यावेळीपनयमचे आमदार कटासनी रामभूपाल रेड्डी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. तसंच यावेळी वृत्तपत्र कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आमदाराच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्याच्या निषधार्थ अशी तोडफोड करण्यात आल्याच्या चर्चा आहेत.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही तोडफोड सुरूच : तोडफोड करतांना आमदार विरोधी बातम्या का प्रसिद्ध केल्या जातात? असा प्रश्न या समर्थकांकडून करण्यात येत होता. त्यानंतर याठिकाणी गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी बराच वेळ या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या उपस्थितीतही घोषणाबाजी आणि तोडफोड सुरूच असल्याचं पहायला मिळालं. या प्रकारानंतर आंध्र प्रदेशमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाहीचा स्तंभ असलेल्या माध्यमांवर हल्ला होत असल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा -

  1. Eenadu Azadi Ka Amrit Mahotsav : ईनाडूच्या विशेष उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक
  2. 'हुधुद' चक्रीवादळग्रस्तांना ईनाडू-रामोजी समुहाने 64 घरे दिली बांधून
  3. प्रतिष्ठित अशा 'चाणक्य' पुरस्कारावर 'ईनाडू वृत्तपत्रा'ची मोहर!

ABOUT THE AUTHOR

...view details