महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

घोटाळ्याची चौकशी करणारी संस्थाच फुटली? 'हिंडेनबर्ग'च्या आरोपांना अदानी समूहानं दिलं उत्तर - Adani Group On Hindenburg Research

Adani Group On Hindenburg Research : हिंडेनबर्ग रिसर्चनं सेबी प्रमुख आणि अदानी समूह यांच्यार गंभीर आरोप केले होते. या आरोपांना अदानी समूहानं निवेदन काढत उत्तर दिलंय. अदानी समूहानं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच सेबी प्रमुखांनीही हे आरोप फेटाळले. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर...

Adani Group On Hindenberg Research
हिंडेनबर्ग रिसर्च आणि अदानी समूह (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 1:38 PM IST

Updated : Aug 11, 2024, 1:52 PM IST

नवी दिल्ली Adani Group On Hindenburg Research : हिंडनबर्ग रिसर्चनं सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (SEBI Chief Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी (Adani) घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक (Investment) असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला. मात्र, माधवी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. यावर आता अदानी समूहानं निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

अदानी समूहानं आरोप फेटाळले :हिंडनबर्गने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सेबी प्रमुख माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती यांचे ऑफशोअर फंड 'बर्म्युडा अॅन्ड मॉरिशस' फंडमध्ये छुपी भागीदारी होती. या फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा दावा करण्यात आला.' आयआयएफएल' प्रकटीकरणातून बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती ही 10 दशलक्ष डॉलर असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही हिंडनबर्गनं अदानी समुहावर आरोप केले होते. मात्र, अदानी समुहानं ते फेटाळून लावले होते.

अदानी समुहानं निवेदन केलं जारी : हिंडेनबर्ग रिसर्चच्या ताज्या अहवालावर अदानी समूहानं एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की, "हिंडेनबर्गनं केलेले नवीनतम आरोप हे वैयक्तिक नफा कमावण्यासाठी आहेत. तसेच वस्तुस्थिती आणि कायद्याकडं दुर्लक्ष करून, पूर्व-निर्धारित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीची दुर्भावनापूर्ण, खोडकर आणि फेरफार करणारे हे आरोप आहेत." निवेदनात पुढे म्हटलं की, "समूहावरील आरोप हे पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. याआधीही असेच आरोप केले होते व त्याची सखोल चौकशी केली गेली आहे, ते आरोपही निराधार असल्याचे सिद्ध झालं होतं."

माधबी आणि धवल बुच यांचं स्पष्टीकरण : "हिंडेनबर्ग रिसर्चनं अहवालात केलेले आरोप हे निराधार असून, आम्ही त्याचं खंडन करतो. आपले जीवन आणि आर्थिक परिस्थिती हे एक खुले पुस्तक आहे," असं स्पष्टीकरण सेबी प्रमुख माधवी बुच यांनी दिलं.

काय आहे नेमकं प्रकरण? : गेल्या वर्षी अदानी समूहातील गैरव्यवहाराचा गौप्यस्फोट करणाऱ्या 'हिंडनबर्ग रिसर्च'नं शनिवारी थेट सेबीवरच बॉम्ब टाकला. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच व त्यांच्या पतीची अदानी समूहाच्या कंपनीत भागीदारी आहे. त्यामुळेच सेबीनं शेअर्स किमतीतील हेराफेरी, मनी लॉण्डरिंग आदी गंभीर आरोपांनंतरही अदानी समूहावर 18 महिन्यांत कोणतीच कारवाई केली नाही, असा गौप्यस्फोट 'हिंडनबर्ग रिसर्च'ने केला. शेअर बाजारातील घोटाळय़ाचा तपास करणारी संस्थाच फुटल्याचे यातून उघड झाल्याने प्रचंड खळबळ उडाली.

काय आहे 'हिंडनबर्ग रिसर्च'चा अहवाल : 'हिंडनबर्ग रिसर्च'नं नवीन पोस्ट शेअर करून थेट सेबी आणि गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या कनेक्शनची पोलखोल केली. अदानी समूहातील घोटाळय़ात वापर केलेल्या 'ऑफशोर कंपन्यां'मध्ये सेबीच्या प्रमुख माधवी बूच व त्यांच्या पतीची भागीदारी आहे. याच भागीदारीमुळे सेबीनं अदानी समूहाची पाठराखण केली आणि गंभीर आरोपांनंतरही कारवाई केली नाही, असा दावा 'हिंडनबर्ग रिसर्च'ने केला.

सेबीनं 'हिंडनबर्ग'ला पाठवली होती नोटीस : जूनमध्ये सेबीनं 'हिंडनबर्ग'ला भारतामधील नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून नोटीस बजावली होती. 'हिंडनबर्ग'ने पहिल्यांदाच आपल्या अहवालात कोटक बँकेच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केला होता. त्यानंतर कोटक बँकेच्या शेअर मूल्यामध्ये मोठी घसरण झाली होती. 'हिंडनबर्ग'ने सेबीची नोटीस 'बकवास' असल्याचे म्हटले होते.

हेही वाचा -

  1. 'हिंडेनबर्ग रिसर्च'च्या ट्विटनंतर भारतात खळबळ; अदानी समूहानंतर कोणाला करणार लक्ष्य? - Hindenburg Research
  2. मनीष सिसोदिया दाखल होण्यापूर्वीच बदल्यांचा धडाका; दिल्ली शिक्षण विभागातील 100 मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या - Delhi Education Department Transfer
  3. इसीसचा दहशतवादी रिझवान अलीला ठोकल्या बेड्या ; काळाचौका पोलीस ठाण्यात होता गुन्हा दाखल, पुण्यात बनवायचा आयईडी - ISIS Terrorist Rizwan Ali Arrested
Last Updated : Aug 11, 2024, 1:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details