नवी दिल्ली :दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागात पदयात्रेदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि 'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीनं द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीला अरविंद केजरीवाल यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच ताब्यात घेतलं.
पदयात्रेदरम्यान फेकले द्रव पदार्थ : राजधानी दिल्लीतील ग्रेटर कैलास परिसरात पदयात्रेदरम्यान दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका व्यक्तीने द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या व्यक्तीला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या रोज प्रचार करत आहेत. या पदयात्रेदरम्यान आज ग्रेटर कैलास येथे केजरीवाल यांच्यावर द्रव पदार्थ फेकण्याचा प्रयत्न केला.
मालवीय नगर परिसरात अरविंद केजरीवाल यांची पदयात्रा सुरू होती. सायंकाळी ५.५० वाजता ते लोकांशी हस्तांदोलन करत असताना अचानक अशोक झा नावाच्या व्यक्तीनं अरविंद केजरीवाल यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस कर्मचारी जवळच असल्याने संबंधित व्यक्ती लगेच पकडला गेला. त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. तो व्यक्ती खानापूर आगारात बस मार्शल म्हणून कार्यरत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. - दिल्ली पोलीस