कठुआ Train Running Without Driver : रेल्वे स्थानकावर (Kathua Railway Station) मोठा निष्काळजीपणा समोर आलाय. येथे थांबलेली मालगाडी उतारामुळं अचानक ड्रायव्हरविना पठाणकोटच्या दिशेनं जाऊ लागली. हे पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पंजाबमधील उन्ची बस्सीजवळ ही रेल्वे थांबवण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलीय. ही रेल्वे ताशी 70-80 किमी वेगाने धावत असल्याचं वृत्त असल्याची प्राथमिक माहिती जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापकांनी दिली.
रेल्वे ड्रायव्हरविना धावली : एक मालगाडी कठुआ रेल्वे स्थानकावरून पठाणकोटच्या दिशेनं लोकोमोटिव्ह पायलटशिवाय निघाली. या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळताच, त्यांनी एक रिकव्हरी इंजिन रेल्वे थांबवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. बऱ्याच संघर्षानंतर पंजाबमधील उची बस्सीजवळ ड्रायव्हरविना धावणारी मालगाडी थांबवण्यात आली. त्यानंतर लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
घटनेची हौणार चौकशी : कठुआ स्थानकावर थांबलेली रेल्वे अचानक ड्रायव्हरविना धावायला लागली होती. अनेक किलोमीटर अंतर पार केल्यावर ही रेल्वे थांबवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आलंय. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय. "ही रेल्वे ताशी 70-80 किमी वेगानं धावत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे," अशी माहिती जम्मूचे विभागीय वाहतूक व्यवस्थापकांनी दिली.
याआधीही घडली होती अशीच घटना : खनिजाची वाहतूक करणाऱ्या एका रेल्वे गाडीने चालकाविना तब्बल 90 किलोमीटर प्रवास केल्याची घटना ऑस्ट्रेलियात घडली होती. चालकाविना धावणारी ही मालगाडी थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. सुमारे तासाभराचा प्रवास केल्यानंतर रेल्वेरुळांवर अडथळे उभे करून ही मालगाडी रुळांवरून खाली घसरवण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा -
- पैशांची बॅग समजून चोरट्यांनी स्फोटकांची बॅग चोरली, कल्याण रेल्वे स्थानकावरील स्फोटकांप्रकरणी खुलासा
- रेल्वेत कॉलेज तरुणीचा विनयभंग; ट्रेन अटेंडंटला अटक, पीडिता पिकनिकसाठी आली होती मायानगरीत
- अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बुलेट ट्रेन बोगदाचं ब्लास्टिंग; देशात पहिल्यांदाच समुद्राखालून धावणार रेल्वे