महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वऱ्हाड्यांवर काळाचा घाला; चालकाला डुलकी लागल्यानं कार डिव्हायडरला धडकून चार ठार

लग्नावरुन परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या कारचा भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. कार अगोदर डिव्हाडरला धडकून खड्ड्यात गेली.

Car Collides With Divider
अपघातग्रस्त कार (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 2:02 PM IST

भोपाळ :चालकाचे नियंत्रण सुटल्यानं डिव्हायडरला कार धडकून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील मैहर इथं घडली. सुखविधान सिंह, दामोदर सिंह, अरविंद सिंह आणि शिवराज सिंह असं मृत झालेल्या वऱ्हाड्यांची नावं आहेत. कार अपघातात ठार झालेले सर्वजण हे देवेंद्रनगर पन्ना जिल्ह्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. घसडू नदीजवळ चालकाला डुलकी लागल्यानं हा अपघात झाल्याचंही यावेळी सूत्रांनी सांगितलं आहे. कारमधील सगळेजण हे लग्न समारंभावरुन परत येत असताना ही अपघात घडला आहे.

वऱ्हाड्यांवर काळाचा घाला :सुखविधान सिंह, दामोदर सिंह, अरविंद सिंह आणि शिवराज सिंह हे मध्य प्रदेशातील कटनी इथं लग्न समारंभाला गेले होते. यावेळी परत येताना राष्ट्रीय महामार्ग 30 जवळील घसडू नदीजवळ चालकाला डुलकी लागली. त्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारचा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. यावेळी नागरिकांनी बचावकार्य केलं, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही.

कारच्या काचा फोडून बाहेर काढले मृतदेह :मैहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "कटनीवरुन मैहरच्या दिशेनं येताना कार क्रमांक एमपी 35 सीए 5631 कारच्या चालकाला घसडू नदीजवळ डुलकी लागली. त्यामुळे चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे कार अगोदर डिव्हायडरला धडकली. त्यानंतर ती रस्त्यावरील खड्ड्यात पडल्यानं कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला." या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळावर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. नागरिकांना अपघाताची माहिती दिल्यानंतर मैहर पोलीस स्टेशनच्या जवानांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढले. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा :

  1. बस उलटून भीषण अपघात; 7 प्रवाशांचा मृत्यू अनेक गंभीर
  2. निवडणूक कर्तव्य बजावून घरी जाताना दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवलं, तलाठी जागीच ठार
  3. गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार पलटली, कोल्हापुरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details