रायपूर : सुरक्षा दलाच्या जवानांना छत्तीसमगडमधील कारवाईत मोठं यश मिळालं आहे. जवानांनी नक्षलवाद्याशी झालेल्या चकमकीत तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. छत्तीगड तेलंगाणा सीमावर्ती परिसरात ही कारवाई करण्यात आली. बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या नक्षलवादी चकमकीत सुरक्षा दलांनी 12 नक्षलवाद्यांना ठार मारलं आहे, अशी माहिती सुरक्षा दलाच्या वतीनं देण्यात आली.
12 नक्षलवाद्यांचा खात्मा :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9 वाजता सुरक्षा दलाचं एक संयुक्त पथक दक्षिण विजापूरच्या जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर गेलं होतं. यावेळी जवानांनी शोध घेतला असता नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाली. संध्याकाळपर्यंत नक्षलवाद्यांकडून गोळीबार सुरूच होता. या कारवाईत राज्य पोलिसांच्या तीन जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG), COBRA च्या पाच बटालियन (CRPF चे एक एलिट जंगल युद्ध युनिट - रिझोल्यूट अॅक्शनसाठी कमांडो बटालियन) आणि CRPF ची 229 वी बटालियन सहभागी यांनी सहबाग घेतला. यावेळी झालेल्या चकमकीत जवानांनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खातमा केला. परिसरात अजूनही शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांची कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं यावेळी सुरक्षा दलाच्या वतीनं सांगण्यात आलं. सुरक्षा दल परतल्यानंतर पोलीस सविस्तर माहिती देतील, असंही यावेळी सांगण्यात आलं.