महाराष्ट्र

maharashtra

घनदाट जंगलातील नक्षली मोहीम फत्ते करुन C-60 कमांडो परतले - 12 Naxalites killed

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 4:27 PM IST

Updated : Jul 18, 2024, 6:35 PM IST

12 Naxalites killed : काल छत्तीसगड तसंच महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शोध मोहिमेदरम्यान, चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

C-60 commando
C- 60 कमांडो (ETV BHARAT National Desk)

कांकेर 12 Naxalites Killed :महाराष्ट्र तसंच छत्तीसगडच्या सीमेवर बुधवारी झालेल्या चकमकीत 12 कट्टर माओवादी ठार झाले. पोलिसांनी ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे. हे संपूर्ण एन्काउंटर ऑपरेशन C-60 कमांडोंनी केलंय. यशस्वी ऑपरेशननंतर सी-60 सैनिक नदी पार करून त्यांच्या छावणीत सुखरूप पोहोचले. जवान परततानाचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये सैनिक नदी पार करून छावणीकडं कूच करताना दिसत आहेत.

ऑपरेशनवरून परतणारे C-60 कमांडो (ETV BHARAT National Desk)

C-60 चे कमांडो ऑपरेशननंतर परतले : नक्षलविरोधी कारवायांमध्ये, बस्तरचे हवामान, भौगोलिक परिस्थिती सैनिकांना अनेकदा त्रास देते. असं असतानाही जवानांनी धैर्यानं सर्व आव्हानांना मागं टाकून नक्षलविरोधी अभियान यशस्वी केलं आहे. शूर कमांडोंच्या गटानं बुधवारी ज्या प्रकारे 12 माओवाद्यांचा खात्मा केला, त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत. सहा तास चाललेल्या या चकमकीत दोन उपनिरीक्षक जखमी झाले आहेत.

जखमी कमांडोंना हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं काढलं बाहेर :या चकमकीत दोन जवान जखमी झाले. जखमी जवानांमध्ये उपनिरीक्षक सतीश पाटील हे मुळचे महाराष्ट्राचे आहेत. त्यांच्या खांद्याला गोळी लागली. दोन्ही जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं महाराष्ट्रातील गडचिरोली येथे पाठवण्यात आलं आहे. कांकेर जिल्ह्यातील पखंजूर तसंच महाराष्ट्राच्या सीमेवरील गडचिरोलीच्या जंगलात ही चकमक झाली. बुधवारी सकाळी 10 वाजता माओवाद्यांशी सुरु झालेली चकमक तब्बल चार तासांनंतर संपली. चकमकीनंतर परिसरात सखोल शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

12 नक्षलवाद्यांवर 86 लाखांचं बक्षीस : गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांडोली जंगलात बुधवारी झालेल्या चकमकीत 7 पुरुष, 5 महिला नक्षलवाद्यांचा ठार झाले. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांवर तब्बल 300 हुन अधिक गुन्हे असून 86 लाखांचं बक्षीस होतं. गडचिरोली पोलिसांच्या सी-60 च्या 7 तुकड्यांच्या जवळपास 200 जवानांनी हे अभियान राबवून नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

ठार मारले गेलेले नक्षली :

1. DVCM योगेश तुलावी, चातगाव कसनसूर दलम प्रमुख

2. DVCM विशाल ऊर्फ लक्ष्मण आत्राम, कोरची/ टिपागड दलम प्रमुख

3. DVCM प्रमोद कचलामी, टिपागड दलम प्रमुख

4. महारू गावडे, चातगाव कसनसूर दलमचे उप कमांडर

5. अनिल दरो, टिपागड कोरचीचे उप कमांडर

6. बिजू, चातगाव कसनसूर दलम सदस्य

7. सरिता परसा, चातगाव/कसनसूर दलम सदस्य

8. राजो, चातगाव कसनसूर सदस्य

9. रोजा, चातगाव कसनसूर दलम सदस्य

10 सागर, कोरची दलम सदस्य

11. चांदा, कोरची टिपागड दलम सदस्य

12. सीता हॉके, कोरची टिपागड दलम सदस्य

'हे' वाचलंत का :

  1. नक्षलवाद्यांनी घडवला आयएडी स्फोट; दोन जवानांना वीरमरण, चार जवान गंभीर - STF Jawans Martyred In IED Blast
  2. दोडा एन्काऊंटर : भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांची सलग चौथ्या दिवशी शोधमोहीम, चकमक पुन्हा सुरू - Doda Encounter
Last Updated : Jul 18, 2024, 6:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details