मुंबई Lok Sabha Election 2024 : राज्यात नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांची मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, यादरम्यान मतदान प्रक्रिया बाधित होत आहे, असं दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याची खोटी माहिती देणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात आहेत. दरम्यान, या व्हिडिओसंदर्भात आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. निवडणूक काळात व्हायरल होणारे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शी संबंधित नाहीत, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. तसंच राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली, असं देखील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी स्पष्ट केलंय.
निवडणुकीदरम्यान व्हायरल होणाऱ्या व्हिडिओसंदर्भात निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Published : May 25, 2024, 1:24 PM IST