ETV Bharat / sports

15 वर्षांनंतर बांगलादेश करेबियन संघाविरुद्ध सामना जिंकणार की वेस्ट इंडिज वर्चस्व राखणार? रोमांचक सामना 'इथं' पाहा लाईव्ह - WI VS BAN 1ST TEST LIVE IN INDIA

वेस्ट इंडीज विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे.

WI vs BAN 1st Test Live Streaming
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 22, 2024, 7:30 AM IST

अँटिग्वा WI vs BAN 1st Test Live Streaming : वेस्ट इंडीज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज 22 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा इथं खेळवला जाईल. बांगलादेशनं 2009 मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर बांगलादेशला वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव करता आलेला नाही.

विजयी मार्गावर परतण्याचा करेबियन संघाचा प्रयत्न : यजमान वेस्ट इंडिजनं नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मायदेशात कसोटी मालिका 1-0 नं गमावली होती. यानंतर ते बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील. त्याचबरोबर बांगलादेशलाही दक्षिण आफ्रिकेकडून नुकत्याच झालेल्या मायदेशातील कसोटी मालिकेत 2-0 अशा पराभवानंतर जोरदार पुनरागमन करायचं आहे. वेस्ट इंडिजचं कर्णधारपद क्रेग ब्रॅथवेटकडे आहे.

कसोटीनंतर होणार वनडे मालिका : दुसरीकडे बांगलादेशची कमान नझमुल हुसेन शांतोकडे असेल. संघाचा अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीम हा देखील दुखापतीमुळं या मालिकेत खेळू शकणार नाही. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये तीन वनडे आणि तीन T20 सामनेही खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत ही कसोटी मालिका दोन्ही संघांना आपली ताकद दाखवण्याची आणि आगामी सामन्यांसाठी आत्मविश्वास वाढवण्याची संधी असेल.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : कसोटी फॉर्मेटमध्ये वेस्ट इंडिजकडे बांगलादेशविरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी आहे. उभय संघांमधील 20 कसोटी सामन्यांपैकी वेस्ट इंडिजनं 14 सामने जिंकले आहेत तर बांगलादेशनं 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोघांमध्ये 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. वेस्ट इंडिजनं या फॉरमॅटमध्ये अधिक यश मिळवलं असून बांगलादेशविरुद्धच्या गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबर (शुक्रवार) पासून सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा इथं भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल.

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं आणि कसं पहावं?

वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिका भारतात प्रसारित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळं भारतात वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू इच्छिणाऱ्या चाहत्यांना ते टीव्ही चॅनेलवर पाहता येणार नाही. मात्र, चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे या मालिकेचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :

वेस्ट इंडिज : क्रॅग ब्रॅथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलेक अथानाझ, कावीम हॉज, जोशुआ दा सिल्वा (यष्टिरक्षक), अँडरसन .फिलिप, जस्टिन ग्रीव्हज, अल्झारी जोसेफ, केमार रोच, शमर जोसेफ

बांगलादेश : शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, मोमिनुल हक, हसन महमूद, तैजुल इस्लाम, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद.

हेही वाचा :

  1. पाकिस्तानचा अजब निर्णय, एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्याला बनवलं बॅटिंग कोच
  2. न्यूझीलंडविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात कांगारुंना हरवणार? ऐतिहासिक सामना 'इथं' पाहा लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.