मुंबई Deputy CM Ajit Pawar : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्याचा, त्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.
शासनातर्फे खेळाडूंना प्रोत्साहन : आमदार हिरामण खोसकर यांनी आज औचित्याच्या मुद्द्यांद्वारे खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यासंदर्भात सभागृहात माहिती दिली. या निर्णयाने खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी निकषांमध्ये आणखी मुद्द्यांची भर घालणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
Published : Jun 29, 2024, 11:04 PM IST