Vasant Chavan Info : 'वंचित'चा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा; काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांचा दावा - Lok Sabha Election - LOK SABHA ELECTION
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 31, 2024, 11:00 PM IST
नांदेड VBA Support To Congress In Nanded : वंचित बहुजन आघाडीने नांदेड लोकसभा मतदार संघात काँग्रेसला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी केला आहे. "वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देणार असं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता नांदेड लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे," अशी माहिती वसंत चव्हाण यांनी दिलीये. वंचितने दिलेल्या पाठिंब्याबद्दल वसंत चव्हाण यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी चव्हाण बोलत होते. "वंचितच्या पाठिंब्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेसला चांगलेच बळ मिळणार आहे," असं यावेळी त्यांनी सांगितलं. नवा मोंढा येथे उद्घाटन प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. यामध्ये कमल किशोर कदम, शिवसेना उबाठा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हा प्रमुख माधव पावडे, प्रमोद खेडकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.