शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या गुरूपौर्णिमा उत्सवाला सुरुवात; पाहा व्हिडिओ - Gurupurnima Festival Shirdi - GURUPURNIMA FESTIVAL SHIRDI

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 11:26 AM IST

शिर्डी Guru Purnima In Shirdi : दरवर्षीप्रमाणं याही वर्षी शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्‍सव साजरा करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आज पहाटेपासून अत्यंत भक्तिमय वातावरणात सुरुवात झालीय. साईंची प्रतिमा, पोथी आणि विणेच्या मिरवणुकीनं या उत्सवास आज प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, या उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविक पायी पालख्यांसह शिर्डीत दाखल झालेत. उत्सवाच्या परंपरेनुसार आज साईंच्या काकड आरतीनंतर साईंची प्रतिमा, पोथी आणि विणा यांची विधीवत पूजा करत द्वारकामाईपर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जिल्‍हाधिकारी तथा साई संस्थानचे तदर्थ समिती सदस्‍य ‍सिध्‍दाराम सालीमठ यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी विणा घेऊन तर मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि प्रशासकीय अधिकारी विश्‍वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेवून या उत्सवात सहभाग घेतला होता. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.