मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेमुळे ओबीसींवर कुठेही अन्याय होणार नाही - उदय सामंत - मराठा आरक्षण
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 2, 2024, 5:20 PM IST
बीड Maratha Reservation : मराठा आरक्षणाची जी अधिसूचना तयार केली आहे, त्यामुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका आहे, असं मत शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. (Minister Uday Samant) ते बीडमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणाच्या स्टेटमेंटमध्ये कुठेही वाद वाढवायचा नाही. ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही किंवा ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही ही भूमिका सरकारची आहे. (OBC Reservation)
छगन भुजबळ ज्येष्ठ सहकारी : छगन भुजबळ हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या पक्षाच्या आमदारांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. ही पक्षाची भूमिका नाही आणि छगन भुजबळ यांच्याशी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करतील. मराठा समाजाला आरक्षण देताना 'इम्परिकल डेटा' गोळा करायचं काम सुरू आहे, असंही मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.