भारतीय क्रिकेट संघाच्या परेडसाठी कडक सुरक्षा व्यवस्था : चाहत्यांची मरीन ड्राइव्हवर गर्दी, रोड शोसाठी टीम इंडियाची बस तयार - T20 World Cup 2024 - T20 WORLD CUP 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 5:39 PM IST
मुंबई Indian cricket team roadshow : गुरुवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या रोड शोसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येनं मरीन ड्राइव्ह परिसरात जमले आहेत. गुरुवारी सकाळी मायदेशी परतलेला विश्वविजेता भारतीय संघचा खुल्या बसमधून रोड शोमध्ये होणार आहे. त्यानंतर दक्षिण मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर संघाचा सत्कार समारंभ होईल. बुधवारी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं चाहते येणार आहेत. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी खबरदारी घेत आहेत. तत्पूर्वी, भारतीय क्रिकेट संघ विशेष विमानानं बार्बाडोसहून मायदेशी परतलाय. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाहत्यांनी खेळाडूंचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था असल्यानं चाहत्यांना खेळाडूंच्या जवळ जाता आलं नाही. टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्ली विमानतळावर पोहोचली. त्यानंतर पीएम हाऊसमध्ये येऊन पंतप्रधानांची भेट घेतली. आता टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह विजय परेडसाठी मुंबईला रवाना झाली आहे.