काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांचा भाजपाला आशीर्वाद; अर्चना चाकूरकर यांच्या भाजपा प्रवेशावर संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिक्रिया - Archana Patil BJP Entry - ARCHANA PATIL BJP ENTRY
🎬 Watch Now: Feature Video
Published : Apr 3, 2024, 5:01 PM IST
लातूर Archana Patil BJP Entry :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभा अध्यक्ष माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkars joins BJP) यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावर भाजपाचे निलंगाचे आमदार तथा माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी सांगितलं की, राजकारणात तब्बल ४०-५० वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेला चाकूरकर परिवार भाजपासोबत आला असून चाकूरकर परिवारातील सर्व सदस्यांचा भाजपाला आशीर्वाद आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. परंतु त्यांच्या पाठीमागे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा आशीर्वाद आणि त्यांचे वलय डॉ. अर्चना यांच्या पाठीमागे आहे.
काँग्रेसनं डॉ. आंबेडकरांवर अन्याय केला : काँग्रेसची घाणेरडे राजकारण करण्याची प्रथा असून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काँग्रेसनं अनेक वर्षापासून केलं आहे. ज्या काँग्रेसनं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अन्याय केला ते प्रकाश आंबेडकर यांना काय मदत करणार? शेवटी त्यांनाही बाजूला टाकलं. लातूरमध्येही काँग्रेसनं विषारी राजकारण केलंय. राजकारणात हे विष कसं? कुठून आलंय? याचा समाचार जाहीर सभेत घेणार असल्याची भूमिका भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलीय.