मतदान आपल्या देशाच्या भविष्यासाठी महत्वाचं; सचिन तेंडुलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 20, 2024, 10:49 PM IST
मुंबई Lok Sabha Election 2024 : दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) आज मुंबईत लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदान केलं. उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक प्रक्रियेत मतदार जागरुकता वाढवण्यासाठी तेंडुलकर यांना निवडणूक आयोगाचे 'राष्ट्रीय आयकॉन' म्हणून ओळखले जाते. त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर, जो इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी मुंबई इंडियन्स (MI) साठी खेळतो, तो देखील त्याच्या वडिलांसोबत मतदानासाठी उपस्थित होता. सचिन आणि अर्जुनने मतदान केल्यानंतर शाई लावलेले बोट दाखवले. यावेळी त्यांनी देशाच्या भविष्यासाठी मत करण्याचं आवाहन केलं
लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा हा निवडणूक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये सर्व नागरिकांना सुरळीत आणि सुरक्षित मतदानाचा अनुभव मिळावा यासाठी चांगल्या प्रकारे व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसाठी पाचव्या टप्प्यात निवडणूक पार पडली आहे.