पुण्यात मुसळधार पावसामुळं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी; पाहा व्हिडिओ - Pune rain updates - PUNE RAIN UPDATES
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 25, 2024, 2:58 PM IST
पुणे Heavy Rainfall In Pune : पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली असून पुण्यातल्या अनेक भागांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचलंय. काही ठिकाणी घरांची पडझड झालीय. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळं वाहतूक ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळं वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पुण्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळं जवजीवन विस्कळीत झालं असून या पावसामुळं सिंहगड रोड, वारजे, शिवणे, शिवाजीनगर याठिकाणी पाणी साचलय. सिंहगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर तीन सोसायटीमध्ये पाणी साचलंय. नदीपात्र रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौकामध्ये देखील कमरेइतकं पाणी साचलंय. या परिस्थितीत पुणे शहर पिंपरी चिंचवड भागातील कार्यालय आणि इतर आस्थापनांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. तसंच पुणे महानगरपालिकेकडून पावसात अडकलेल्यांच्या मदतीसाठी बचाव पथकही नियुक्त करण्यात आलय.