पुणे अपघात प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले... - Pune Hit And Run Case - PUNE HIT AND RUN CASE

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 12:10 PM IST

पुणे Ravindra Dhangekar On Pune Hit And Run Case :  पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी नुकतीच मोठी अपडेट समोर आलीय. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली. असं असतानाच आता याप्रकरणी पुण्यातील कसबा पेठचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गंभार आरोप केलेत. या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी मनोज पाटील हे हस्तक्षेप करत असल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय. "ज्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलीये, त्यांना चौकात फाशी दिली पाहिजे. तसंच या विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यायला हवा, "असंही धंगेकर यावेळी म्हणाले. रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.