पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज कपूर यांना अनोखी आदरांजली, १०० व्या जयंती निमित्त घेतली कपूर कुटुंबीयांची भेट - SHOW MAN RAJ KAPOOR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Dec 12, 2024, 10:29 PM IST
नवी दिल्ली : अष्टपैलू अभिनेते शॉ मॅन राज कपूर यांच्या शंभराव्या जयंतीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कपूर कुटुंबीयांची नुकतीच भेट घेतली. राज कपूर यांचा एक प्रकारे हा मोठा सन्मान आहे. देशाचे पंतप्रधान एखाद्या कलाकाराच्या कुटुंबाला, ज्या संपूर्ण कुटुंबानं कलेसाठी जीवन वाहिलं आहे, त्यांना भेटतात ही देशातील कलाकारांच्या दृष्टीनं सन्मानाची बाब आहे. खरं तर पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि बंधू, रणधीर कपूर आणि बंधू त्यानंतर रणबीर कपूर आणि बंधू भगिनी अशी कपूर घराण्याची चौथी पिढी चित्रपटसृष्टीत आहे. यांचाही पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्तानं सन्मान केला. त्यांच्याशी पंतप्रधान मोदी यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी राज कपूर यांची मुलगी सून तसंच नातवंडं आणि जावई उपस्थित होते.