सुदर्शन पटनायक यांनी दिला वाळू शिल्पातून मतदान जागृतीचा संदेश; पाहा व्हिडिओ - sand artist Sudarshan Patnaik
🎬 Watch Now: Feature Video
Published : Mar 10, 2024, 7:39 PM IST
पुरी (ओडिशा) Sudarshan Patnaik Sand Art : ओडिशाचे वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदानाचं महत्त्व आपल्या कलाकृतीतून दाखवून दिले आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी त्यांनी सँड आर्ट तयार केलं आहे. सुदर्शन यांनी आपल्या कलाकृतीतून संदेशही दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'माझे पहिले मत देशासाठी आहे'. दरम्यान, भारताची राज्यघटना सर्व सज्ञान म्हणजेच 18 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार देते. मात्र, हा अधिकार बजावण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं आवश्यक आहे. मत देण्याचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांना आहे. म्हणजेच जी व्यक्ती भारताची नागरिक नाही ती मतदान करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही भारताचे नागरिक असाल आणि तुमचं नाव मतदार यादीतच नसेल, तरीही तुम्ही मतदान करू शकत नाही.