आणखी एक 'नीट' घोळ; फेरपरीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले विद्यार्थीनीचे गुण - NEET Exam Scam - NEET EXAM SCAM
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 17, 2024, 4:13 PM IST
यवतमाळ NEET Exam Scam : नॅशनल टेस्टींग एजेन्सी (एनटीए) नं राबविलेल्या वैद्यकीय प्रवेश 'नीट' परीक्षेचा सावळा गाेंधळ संपता संपत नाही. या घाेटाळ्याचा फटका यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीला चांगलाच बसला आहे. यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीनं 'नीट'ची झालेली फेरपरीक्षा दिली नाही. मात्र, तरीही तिला नव्यानं गुणपत्रिका आली आणि त्यात तिचे गुण 640 वरुन थेट 172 वर खाली आले आहेत. परीक्षेतील या सावळ्या गोंधळामुळं विद्यार्थीनीला जबर मानसिक धक्का बसला आहे. भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रँक 11,769 होती. मात्र, दुसऱ्यांदा झालेली परीक्षा तिनं दिली नसताना नव्यानं आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 172 वर खाली आले आणि 11 हजाराच्या रँकवरुन ती थेट 11,15,845 व्या रँकवर घसरली. एनटीएनं ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती.