नीट घोटाळा प्रकरण मास्टरमाईंड गंगाधर मुंडे आणि इराण्णा कोनगुलवार अटक, उद्या पहाटेपर्यंत लातूरला आणण्यात येणार - Neet Paper Leak Case

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 2:17 PM IST

thumbnail
आरोपी इराणा कोनगुलवार याच्या लातूरातील घराबाहेरून 'ई-टीव्ही भारत' ने घेतलेला आढावा (ETV Bharat Reporter)

लातूर NEET Paper Leak Case : वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा (नीट) घोटाळ्याचे मास्टरमाईंड गंगाधर मुंडे आणि इराण्णा कोनगुलवार यांना अटक करण्यात आले आहे. हे दोन मुख्य सूत्रधार मागील आठवड्यापासून तपास यंत्रणांना गुंगारा देत फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी लातूर पोलिसांचे एक पथक उत्तराखंडमध्ये ठाण मांडून बसले होते. या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले. या दोघांनाही लातूरला आणण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांना चकमा देत हे दोघेही 24 तासात शेकडो किलोमीटर अंतर कापत लोकेशन बदलत होते. परंतु आरोपींच्या लोकेशनचा अंदाज घेत अत्यंत शिताफीने सापळा रचून तपास यंत्रणांनी या दोघांनाही ताब्यात घेतल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. मास्टरमाईंड इराणा कोनगुलवार हा पत्नीसह फरार होता. आरोपी इराणा कोनगुलवार याच्या लातूरातील घराबाहेरून ई-टीव्ही भारत प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.