राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या चिन्हाचं ब्रँडिंग, पाहा व्हिडिओ - Sharad Chandra Pawar
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 23, 2024, 7:31 PM IST
मुंबई NCP Sharad Chandra Pawar party : तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर चिन्हाचं लॉन्चिंग करण्यात येणार आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यासाठी तयार झाला आहे. येत्या शनिवारी म्हणजे उद्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला गुरूवारी पक्षाचं नवं चिन्ह बहाल केलं होतं. त्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत आहे. या नव्या चिन्हाचा लोकार्पण सोहळा रायगडावर शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या आवाजातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.