ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंवर शिवसेना महिला नेत्यानं फेकली चप्पल, देव-देवतांचा अपमान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप - सुषमा अंधारेंवर फेकली चप्पल
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 17, 2024, 7:17 PM IST
अहमदनगर : Throw Slippers On Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक होत भाजपावर सतत जोरदार टीका केलीय. तसंच, अंधारे यांची जुनी भाषणं समोर आल्याने वाद-प्रतिवाद होत आहेत. सुषमा अंधारे 'मातृतीर्थ ते शिवतीर्थ' यात्रेच्या निमित्ताने अहमदनगरला आल्या होत्या. त्या येथील न्यायालयात वकिलांशी संवाद साधण्यासाठी गेल्या असता मनसेच्या नेत्या अॅड. अनिता दिघे आणि शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्ष स्मिता अष्टेकर यांनी त्यांना विरोध केला. अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करून अष्टेकर यांनी त्यांच्या अंगावर चप्पला फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित पोलिसांनी पकडल्यामुळे अनर्थ टळला. यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. तसंच, कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी यावेळी केली. यासंबंधी बोलताना आष्टेकर म्हणाल्या, मी एक कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मी शिवसैनिक आहे. अंधारे यांनी आपल्या जुन्या भाषणात हिंदू देवदेवतांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांचा मी निषेध केला. त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे.