स्वातंत्र्यदिना निमित्त कोयना धरणावर लेझरच्या माध्यमातून नेत्रदीपक तिरंगी रोषणाई, पाहा व्हिडिओ - Koyna Dam - KOYNA DAM
🎬 Watch Now: Feature Video
Published : Aug 14, 2024, 12:27 PM IST
सातारा Koyna Dam : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठं कोयना धरण तिरंगा रोषणाईनं उजळून निघालय. धरणाच्या सांडव्यावर लेझरच्या माध्यमातून तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. नेत्रदीपक तिरंगी रोषणाईचा हा नजारा डोळ्याचे पारणे फेडत आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाला महाराष्ट्राची वरदायिनी आणि उद्योगविश्वाचा कणा मानलं जातं. जलसंपदा विभागाने स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर ही नेत्रदीपक तिरंगी रोषणाई केलीय. यामुळे कोयना धरणाची भिंत तिरंग्यात उजळून निघाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत चांगला पाऊस झाल्यानं धरणातील पाणीसाठ्यानं नव्वद टीएमसीचा टप्पा पार केला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून १५ टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालये देखील तिरंगी विद्युत रोषणाईनं उजळली आहेत.