अनंत-राधिका प्री-वेडिंगसाठी करीना-करिश्मासह रश्मिकानंही केलं उड्डाण - Anant Radhika prewedding - Anant Radhika prewedding - ANANT RADHIKA PREWEDDING
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 29, 2024, 4:53 PM IST
मुंबई - Anant Radhika prewedding : करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर 29 मे रोजी मुंबई विमानतळावर स्टाईलिशपणे अवतरल्या. कपूर सिस्टर्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला उपस्थित राहण्यासाठी युरोपला रवाना झाल्या आहेत. रश्मिका मंदान्नाही मुंबई विमानतळावर दिसली.
करीनाने विमानतळावर आरामदायक डेनिम आणि पांढरा टी-शर्ट परिधान केला होता. तिनं तिच्या लूकमध्ये एक पांढरा आणि निळा शर्ट जोडला होता तर, फॅशन सेन्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या करिश्मा कपूरनं निळ्या रंगाचा ब्लेझर, कॅप आणि मस्त शेड्स, आराम आणि शैली यांचे मिश्रण करून सर्व-काळ्या रंगाचा पेहराव केला होता.
रश्मिका मंदान्नानं विमान प्रवासासाठी बेज स्वेटशर्ट सूट निवडला आणि तिच्या फ्लाइटपूर्वी पापाराझी आणि चाहत्यांशी संवाद साधला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सेलिब्रेशन, इटलीमध्ये सुरू होणाऱ्या लक्झरी क्रूझवर बसून 1 जून रोजी फ्रान्समध्ये पार पडणार आहे. यासाठी असंख्य बॉलिवूड सितारे आणि जागतिक व्यक्तिमत्त्वं सहभागी होणार आहेत. जगभरातून सुमारे 300 व्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
हेही वाचा -
एआर रहमान यांनी पूर्ण केला 'रायन'चा बॅकग्राऊंड स्कोअर, धनुषनं शेअर केली पोस्ट - AR Rahman