"अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसून...", सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितली इनसाइड स्टोरी
🎬 Watch Now: Feature Video
Published : Oct 21, 2024, 11:37 AM IST
पुणे : सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं 9 नोव्हेंबर 2019 रोजी रामजन्मभूमीच्या (अयोध्या) बाजूनं निकाल दिला होता. या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते. दरम्यान, पुण्यात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अयोध्या निकाल देण्यापूर्वीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “पूर्वजांच्या पुण्याईमुळं मी इथवरचा प्रवास करू शकलो. यमाई देवीच्या कृपेनं मी भारताचा सरन्यायाधीश झालोय. न्यायालयात काम करत असताना अनेकदा अशी प्रकरणं समोर येतात. ही प्रकरण सोडवणं अवघड असतं. माझी अशीच काहीशी स्थिती अयोध्या प्रकरणाचा निकाल देताना झाली होती. तीन महिने आम्ही त्यावरील सुनावणी करत होतो. शेकडो वर्षे हा वाद कोणी सोडवू शकलं नव्हतं. तेच प्रकरण आमच्या पुढं येऊन ठेपलं होतं. त्यावेळी यातून मार्ग कसा शोधायचा? असा प्रश्न आम्हाला पडला होता. मी या खटल्याचा निकाल देण्यापूर्वी देवाच्या समोर बसून देवाकडंच मदत मागितली होती. आपला विश्वास आणि आस्था असेल तर मार्ग देव शोधून देतात", अशी भावना यावेळी चंद्रचूड यांनी व्यक्त केली.